वाहिऱ्यात दोघा सख्या भावांचा खून तर तिसरा गंभीर जखमी

 वाहिऱ्यात दोघा सख्या भावांचा खून तर तिसरा गंभीर जखमी



बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाहिरा गावात दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या झाली. आपापसातील वादामुळे ही घटना घडली. पोलिसांनी आतापर्यंत ८ संशयितांना अटक केली आहे. दुसरीकडे, अंबाजोगाईत एका तरुणीच्या भावावर गोळीबार झाला. दोन्ही घटनांनी बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

गुरूवार दि . १६ रोजी वाहिरा येथे रात्री दहा वाजेच्या दरम्यान तीन सख्खा भावांवर त्याच्याच समाजातील काही लोकांनी लोंखडी रॉड, धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना अंभोरा पोलिस ठाणे हद्दीत घडली. अजय विलास भोसले, भरत विलास भोसले असे मयताचे नावे असून कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी आहे.



आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले, भरत विलास भोसले, कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे गुरूवारी आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते. गुरूवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते. रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीनही भावांवर लोंखडी रॉड, धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात अजय विलास भोसले, भरत विलास भोसले या दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला. असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. या घटनतेली सात संशयित आरोपीना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा खून का व कोणत्या कारणावरुन केला हे अद्याप समजले नाही. दोनही मृतदेह आष्टी ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले आहेत. या घटनेने आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे .



घटनास्थळी अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे,बाबासाहेब गर्जे, मनोजकुमार खंडागळे,भरत माने,बाबुराव तांदळे,लुईस पवार,दत्तात्रय टकले,पोलीस अंमलदार शिवदास केदार, सतीश पैठणे अमोल शिरसाठ यांनी भेट देत मोठ्या शिताफिने आठ संशयित आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले .

विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत देखील अशीच घटना घडली आहे. पुण्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या तरुणीच्या भावावर गोळी झाडल्याची घटना घडली आहे. फिर्यादी तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकत प्रॉपर्टी हडप करण्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. पोलिसांनी तातडीने धाव घेत आरोपींचा शोध घेतला आहे. बीड पोलिसांची दोन पथकं आरोपीच्या शोधात रवाना झाली. यानंतर आरोपी गणेश चव्हाण याला पोलिसांनी तातडीने अटक केल्याची माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.