बीड जिल्ह्यातील तबलीग जमातचे अमीर सय्यद नजिब मौलाना साहब यांचे निधन
बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील तबलीग जमातचे अमीर (अध्यक्ष तथा प्रमुख) सय्यद नजिब मौलाना साहब यांचे शनिवार दि. 18 जानेवारी 2025 रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने शहरातील काकू - नाना हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना निधन झाले. मृत्यूसमयी ते 85 वर्षांचे होते. बीड जिल्ह्याच्या तबलीग जमातचे प्रमुख म्हणून ते कार्यरत होते.
बीड शहरातील मर्कज मस्जिद समोरी कारंजा भागातील रहिवासी असलेले सय्यद नजीब सय्यद मासूम सहाब (अमीर सहाब) हे गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. त्यांच्यावर बीड शहरातील काकू नाना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. शनिवारी रात्री त्यांची प्राणजोत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान अमीर साहब सय्यद नजीब मौलाना सहाब यांचा जनाजा रविवार दि. 19 जानेवारी सकाळी 10 वाजता मरकज मस्जिद पासून निघणार आहे. तर 11 वाजता मोमीनपुरा बायपास बिंदुसरा नदीच्या परिसरातील ईजतेमा मैदानावर नमाज - ए - जनाजा होणार आहे. त्यानंतर दफनविधी मासूम कॉलनी मोमीनपुरा बीड येथे होणार आहे.
stay connected