भरधाव वेगाने व हयगयीने वाहन चालवून धडक दिल्याने सचिन सायकड यास शिक्षा
आष्टी प्रतिनिधी :- दिनांक 30 आक्टोबर 2020 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास कानिफनाथ वस्ती समोर कडा ते मिरजगांव जाणारे रोडवर विशाल लक्ष्मण आजबे व महेश बबन खेडकर वस्तीवरून रोडच्या डाव्या बाजूने शिराळकडे जात असताना महिंद्रा जितो कंपनीची गाडी गाडी क्रमांक एम.एच. 16 सी.सी. 2968 चा चालक सचिन सुभाष सायकड रा.राशीन हल्ली मुक्काम मिरजगाव ता.कर्जत जि.अहमदनगर याने त्याच्या ताब्यातील गाडी कडा ते मिरजगांव कडे जाताना भरधाव वेगात हयगयीने व निष्काळजीपणे चालवून पायी जाणारे विशाल आजबे व महेश खेडकर यांना पाठीमाघून जोराची धडक देऊन महेश खेडकर यास गंभीर जखमी केले व विशाल आजबे यास बरगडीला मुक्का मार लागला त्यामुळे फिर्यादी नामे गोरख विनायक आजबे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस स्टेशन भा.द.वि. कलम 279, 337,338, 304 अ तसेच मो.वा.हा.का. 134, 187 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. त्या नंतर आष्टी येथील मे दिवाणी न्यायालय श्रीमती पी. जी. इनामदार यांनी आरोपी सचिन सुभाष सायकड यास भरधाव वेगाने व हयगयीने वाहन चालवून विशाल आजबे व महेश खेडकर यांना पाठीमागून जोराची धडक देऊन जखमी केल्यामुळे भा.द.वि. कलम 279, 337, 338 प्रमाणे प्रत्येकी तीन महिने कारावास भा.द. वि. कलम 304 अ प्रमाणे सहा महिने कारावास व दहा हजार रुपयाचा दंड तसेच मो. वा.का. 134 सह 187 प्रमाणे 500 रुपयांचा दंडाची शिक्षा दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी सुनावली आहे. सरकारी पक्षा तर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील ऍड चंद्रकांत अ. जावळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस दोषी धरून कारावासाची शिक्षा व दंड थोठवण्यात आला. सरकारी पक्षातर्फे ऍड चंद्रकांत अ. जावळे यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म.पो.ह.छाया साप्ते व पो.ह.नितीन बहिरवाळ यांनी काम पाहिले.
stay connected