आष्टी नगरपंचायतच्या स्विकृत नगरसेवकपदी अरूण निकाळजे, बाळासाहेब घोडके

 आष्टी नगरपंचायतच्या स्विकृत नगरसेवकपदी अरूण निकाळजे, बाळासाहेब घोडके



आष्टी ता.३ (प्रतिनिधी)- येथील नगरपंचायत आ सुरेश धस यांच्या ताब्यात असून स्विकृत नगरसेवक अस्लम बेग व अनिता गर्जे या दोन दोघांनी राजीनामे दिल्याने या दोन रिक्त पदासाठी अरूण निकाळजे व बाळासाहेब घोडके यांना संधी देण्यात आली.  ही निवड प्रक्रिया शुक्रवारी (ता ३) बिनविरोध झाली. अरुण निकाळजे व बाळासाहेब घोडके यांचे दोनच अर्ज आले होते. आष्टी नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकामधून एकमताने अरूण निकाळजे व बाळासाहेब घोडके यांची निवड करण्यात आली. या निवडीमध्ये अनेक जण इच्छुक होते परंतु आ. सुरेश धस यांनी शब्द दिला असल्याने निकाळजे व घोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद फटाक्याची आतिषबाजी करुन व गुलाल उधळत साजरा केला. स्विकृत नगरसेवक निवडीचे काम उपविभागीय अधिकारी वसिमा शेख व नायब तहसीलदार बाळदत्त मोरे यांनी पाहिले. यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.