सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी
आष्टी ता.३ (बातमीदार)- तालुक्यातील उपक्रमशिल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सांगवी(पा) शुक्रवारी (ता.३) क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती बालिकादिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेतील अनेक विद्यार्थीनी सावित्रीमाईंच्या वेशभुषेमध्ये उपस्थित होत्या. यावेळी क्षितीजा खिलारे, श्रेयश खंडागळे, तेजश्री कर्डिले या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. अनुष्का खिलारे, स्वरा भोसले, श्रेया खंडागळे, माहिरा शेख, स्वरा खिलारे, श्वेता भगत, देवश्री भोसले, सृष्टी राऊत, राजविर भोसले, श्लोक जगताप हे विद्यार्थी सावित्रीमाई- ज्योतीबांच्या वेशभुषेत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक चांगदेव तरटे हे तर उपक्रमशिल शिक्षक राहूल मुटकुळे, लताबाई जाधव, वैशाली खकाळ, कुंदा पालवे, वैष्णवी भोसले, अंजली खिलारे, निर्मला इरले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आजिनाथ साखरे यांनी तर आभार राहुल मुटकूळे यांनी मानले.
stay connected