शासनाने एसटीची अन्यायकारक भाडेवाढ मागे घ्यावी
-------------------
आष्टी शिवसेनेची निवेदनाव्दारे तहसीलदारांकडे मागणी
------------------
राजेंद्र जैन / कडा
-------------
राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसच्या भाड्यात १५ते २० टक्के वाढ करुन प्रवाशांवर अन्याय केला असून, ही अन्यायकारक भाडेवाढ मागे घेण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. या संदर्भात आष्टीच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
याबाबत आष्टी (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्य परिवहन महामंडळाने सर्वसामान्य प्रवाशांच्या हिताचा कोणताही विचार न करता एसटीच्या प्रवाशी भाड्यात केलेली भाववाढ अन्यायकारक असून, सदर भाडेवाढ त्वरित मागे घेऊन प्रवाशांना दिलासा द्यावा. अन्यथा शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सेनेचे तालुकाप्रमुख सुभाष राऊत यांनी दिला आहे. या निवेदनावर महेश एकसिंगे, माऊली मुटकुळे, अक्षय साप्ते, सचिन आरुण, देवीसिंग बिषेन, बापूराव काळे, रामदास मोहिते, आकाश पिंगळे, आसिफ पठाण, शिवप्रसाद जाधव, गणेश राठोड, संतोष होळकर, रंगनाथ आजबे आदी शिवसैनिकांच्या स्वाक्षरी आहेत.
-----------%%-----
stay connected