गंगाई-बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर

 गंगाई-बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर

















पांडुरंग जाधव,अशोक जोशी, हनुमंत गावडे, सोपानराव निंबोरे,निसार शेख, विजयकुमार गाडेकर, अशोक भांडेकर,हमिद पठाण,शरद तळेकर, बापू खैरे, शबनम काझी, प्रतिक्षा मेश्राम, अशोक डोके,भंडारी,सानप,आदक, भोपळे यांच्यासह आदींचा समावेश*


आष्टी प्रतिनिधी -


आष्टी मतदार संघाचे माजी आमदार तथा शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष भीमसेन धोंडे यांचे माता-पिता यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या वर्षीच्या (एकविसावा) गंगाई बाबाजी महोत्सव २०२५ मधील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणाऱ्या 'गंगाई- बाबाजी आदर्श पुरस्कारांची' घोषणा नुकतीच करण्यात आल्याची माहिती या महोत्सवाचे संकल्पक माजी आमदार भीमसेन धोंडे तसेच संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ यांनी दिली.

आष्टी येथील भगवान महाविद्यालयाद्वारा आयोजित हा महोत्सव ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये संपन्न होत आहे. गुरुवार दि ३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता माजी मंत्री सुरेश नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आ . भीमसेन धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.उद्घाटनानंतर याच दिवशी महाविद्यालयीन वक्तृत्व व काव्यवाचन स्पर्धा घेण्यात येतील. शुक्रवार दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केलेले आहे. शनिवार दि १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता गंगाई बाबाजी आदर्श पुरस्कार विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे , प्रसिद्ध सिनेअभिनेत्री कल्याणी चौधरी,मा.आ.भीमसेन धोंडे, युवा नेते अजय धोंडे, तर यांच्या उपस्थितीत दिला जाणार आहे.तर दुपारी ४ वाजता खुल्या लावणी नृत्य स्पर्धा होणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डॉ दत्तात्रय वाघ, उपप्राचार्य डॉ ज्ञानदेव वैद्य, उपप्राचार्य डॉ आप्पासाहेब टाळके, उपप्राचार्य सुनील भवर, डॉ बाळासाहेब गावडे, डॉ आबासाहेब पोकळे ,डॉ वंदना घोडके व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

--------

   

हे ठरले पुरस्काराचे मानकरी 

१) धार्मिक क्षेत्र- ह भ प पांडुरंग जाधव गुरुजी

अशोक देवा जोशी

 2)सामाजिक क्षेत्र- संजय भास्करराव सानप, डॉ. महेश गोलेकर, श्रीमती लता उत्तम शिंदे, सोनाली संजय बोऱ्हाडे

3) कृषी क्षेत्र- अशोक मारुतीराव गुट्टे,हनुमंतराव गावडे

4) साहित्य क्षेत्र - प्रोफेसर सुधाकर शेलार 

5) पत्रकारिता क्षेत्र - शेख निसार हाफीजोद्दीन ( दै.सकाळ ,आष्टी ), विजयकुमार गाडेकर( शिरूर लोकमत), हमीद खान पठाण, शरद तळेकर, अशोक भांडेकर 

6) शिक्षण क्षेत्र - प्राचार्य डॉ सोपानराव निंबोरे, डॉक्टर बापू खैरे, उत्तम पवार, शहादेव मुळे, श्रीमती शबनम मुबारक काझी, श्रीमती प्रतीक्षा राजेंद्र मेश्राम, डॉ संजय माणिकराव धोंडे, अशोक डोके, ज्ञानेश्वर राऊत 

7) आदर्श उद्योजक- अशोक शेठ भंडारी, हनुमंत जीवे, पांडुरंग सोनवणे 

8) आदर्श तलाठी- श्रीमती मंगल बाबुराव सानप, 

9) आदर्श ग्रामसेवक- श्रीमती निशा रावसाहेब आदक, श्रीमती वर्ष भोपळे, 

10) कलाक्षेत्र- कुमारी वैभवी टाकणकर 

11) क्रीडा क्षेत्र- सोनबा गोगाणे कुस्ती, कुमारी शेख भूषरा नुर.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.