आ.सुरेश धस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त. केवळ पुस्तकांसह शुभेच्छांचा स्वीकार करणार ... पुष्पगुच्छ, हार,फेटे, शाली आणू नयेत.. संयोजकांकडून आवाहन..

 आ.सुरेश धस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त.
 केवळ पुस्तकांसह शुभेच्छांचा स्वीकार करणार ...
पुष्पगुच्छ, हार,फेटे, शाली आणू नयेत..
 संयोजकांकडून आवाहन.. 



आष्टी (प्रतिनिधी)

 आष्टी पाटोदा आणि शिरूर कासार विधानसभा मतदारसंघाचे आमदार लोकनेते सुरेश धस यांचा ५५ वा वाढदिवस दि.२  फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्या निवासस्थानी साजरा होणार असून या निमित्त नागरिकांकडून केवळ शुभेच्छांचा स्वीकार करणार असून त्या सोबत केवळ पुस्तके देऊन शुभेच्छा देण्यात याव्यात असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे ..

याविषयी अधिक माहिती अशी की, आष्टी विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय प्राप्त केलेले

 आमदार सुरेश रामचंद्र धस यांचा ५५ वा वाढदिवस दि.२ फेब्रुवारी २०२५ रोजी आहे या निमित्ताने ते आपल्या आष्टी येथील अद्वैतचंद्र या निवासस्थानी आष्टी सकाळी नऊ ते सायंकाळ पर्यंत जनतेच्या शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत ..

तथापि, केज तालुक्यातील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येमुळे  या वर्षी वाढदिवसा निमित्त फुलांचे हार, पुष्पगुच्छ, शाल, फेटे, स्वीकारणार नसून ..

याप्रसंगी पुस्तक किंवा पुस्तक संच देऊन शुभेच्छा द्याव्यात असे संयोजन समितीद्वारे कळविण्यात आले आहे..

 आष्टी शहरातील पुस्तक विक्रेते आणि काही प्रकाशन संस्था यांनी आष्टी येथील निवासस्थानासमोर आपापले पुस्तकांची विक्रीचे स्टॉल लावावेत आणि विविध प्रकारचे पुस्तके उपलब्ध करून द्यावीत त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, विषयावरील.. पदवीधर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील अशा विषयांची पुस्तके यावेळी प्राधान्याने देण्यात यावीत असेही आवाहन संयोजन समितीद्वारे करण्यात आले आहे..



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.