तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिनी रक्तदान शिबीर
रक्तदात्यांनी सहभाग नोंदवावा- वैशाली पाटील
-----------------------
कडा / वार्ताहर
---------------
आष्टी तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिनी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून, या रक्तदान शिबिरात तालुक्यातील विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचा-यांसह नागरीकांनी सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी. असे आवाहन तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले आहे.
आष्टी तहसील कार्यालयाकडून प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सामाजिकदृष्ट्या रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्यास अनन्य साधारण महत्व आहे. कारण सद्यस्थितीला प्रत्येक तासाला रुग्णालयात एखाद्या का होईना गरजू रुग्णाला रक्ताची गरज भासते, हेच सामाजिक दायित्व ओळखून रविवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळी आष्टीच्या तहसील कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख, अधिकारी कर्मचारी, सर्व सेतु सुविधा केंद्र चालक, महसूल प्रशासनातील ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, सहायक महसूल अधिकारी, महसूल सेवकांसह नागरीकांनी सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी. असे आवाहन तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले आहे.
------%%------
stay connected