सात्रळच्या रयत शैक्षणिक संकुलाचा चित्रकला परीक्षेत शंभर टक्के निकाल

 *सात्रळच्या रयत शैक्षणिक संकुलाचा चित्रकला परीक्षेत शंभर टक्के निकाल*



सात्रळ-(वार्ताहर) नुकत्याच जाहीर झालेल्या इंटरमिजिएट व एलिमेंटरी चित्रकला परीक्षेत राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील विद्यार्थ्यांचा 

रयत शिक्षण संस्थेचे, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालयाचा १००% निकाल लागला असून यामध्ये इंटरमिजिएटसाठी १३ विद्यार्थी प्रविष्ट होते.१३ पैकी १३ विद्यार्थी पात्र झाले.यात अ श्रेणी १ ब श्रेणी ६ विद्यार्थ्यांचा समावेश होतो.तसेच एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत ४४ विद्यार्थी प्रविष्ट होते.यात ४४ पैकी ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.ब श्रेणी ७ विद्यार्थी आले 

     या यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक सतीश नालकर सर , सच्चिदानंद झावरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

   यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, प्रगती पतसंस्थेचे चेअरमन ॲड विजयराव कडू पाटील, स्कूल कमिटीचे अध्यक्ष संभाजीराव चोरमुंगे,शांतीभाऊ गांधी, बबनराव कडू पाटील,डॉ के.के.बोरा, भास्करराव फणसे, युवानेते किरणदादा कडू पाटील, पंकजदादा कडू, विक्रांतदादा कडू, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र बडे पर्यवेक्षिका सुशिला थोरात तसेच शिक्षक,पालक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.