मुगगाव येथे तालुका पातळीवरील आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन

 *मुगगाव येथे तालुका पातळीवरील*
 *आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन*




     आष्टी (प्रतिनिधी )


      शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कलेस वाव मिळावा म्हणून मुगगाव तालुका-पाटोदा जिल्हा बीड येथील स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये तालुका पातळीवरील आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सदर स्पर्धा सोमवार दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी सकाळी ठीक साडेनऊ वाजता सुरू होतील असे संयोजकांनी कळवले आहे.

      या स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे बक्षीस ठेवण्यात आलेली आहेत. 

प्रथम पारितोषिक:- ₹ 2001/-
  द्वितीय पारितोषिक:- ₹ 1501/-
     तृतीय पारितोषिक:- 1001/-

पारितोषिक विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच उत्तेजनार्थ एक बक्षीस ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येईल. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

       या स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे विषय ठेवण्यात आलेले आहेत

*लहान गट*

(प्राथमिक व पूर्व प्राथमिक चे विद्यार्थी)

 1) अण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य

 2) सामुहिक शेती काळाची गरज 

3) राजमाता जिजाऊ माँसाहेब 

4) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

*मोठा गट*

(माध्यमिक व उच्च माध्यमिक चे विद्यार्थी)

1 )ग्रामीण भागातील मुली गुणवत्तेमध्ये मुलांपेक्षा सरस ठरत आहेत. 

2)मोबाईल शाप की वरदान 

3)मानव जातीवरील कोविड-19 संकट

4)सामूहिक शेती काळाची गरज 

        वरीलपैकी एका विषयावर स्पर्धकाने बोलायचे आहे.

       *स्पर्धेचे नियम व अटी* 

१) स्पर्धा मराठी भाषेत होतील.

२) प्रत्येक शाळेतून दोन स्पर्धकांना या स्पर्धेत भाग घेता येईल 

.४) प्रत्येक स्पर्धकास सहा अधिक एक मिनिटे वेळ दिला जाईल.

५) भाषणांचा क्रम लॉट पद्धतीने ठरवला जाईल 

६) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील 

८)पाटोदा तालुक्यातील सर्व शाळांना या स्पर्धेमध्ये भाग घेता येईल 

७) स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांची नावे शाळांनी दिनांक 24 जानेवारी 2025 पर्यंत   ॲड. सीताराम पोकळे, संयोजक( 94 21 63 80 55 )किंवा श्री मुकुंद लगड सर सहसंयोजक (98 60 590 619) आंतरशालेस वक्तृत्व स्पर्धा मुगगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड,  यांच्याकडे पाठवावेत.

असे आवाहन मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजि.तानाजी( बापू )जंजिरे व मुख्याध्यापक श्री अनिल येरकळस सर यांनी केले आहे.

स्थळ:-स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय *मुगगाव* तालुका *पाटोदा* जिल्हा *बीड* 

*दिनांक 27 जानेवारी 2025* *वेळ सकाळी :-09:30 वाजता*

*वार:- सोमवार*

      🙏विनीत🙏


🚩 मराठा सेवा संघ🚩

💐स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय मुगगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड💐

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.