कृषी महाविद्यालय आष्टी येथे शेतीमाल आयात निर्यात एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
आष्टी प्रतिनिधि
शेतीमालाच्या जागतिक बाजारपेठेत शेतकऱ्यांना आणि कृषी व्यवसायाला अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी श्री छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी येथील शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी एक दिवशीय शेतीमाल आयात निर्यात प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना आयात क्षेत्रातील व्यवहारिक आणि तंत्रज्ञान देण्यात आले.
या कार्यशाळेची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे जागतिक स्तरावर शेतीमालाची मागणी असलेल्या उत्पादनांचे विश्लेषण, आयात निर्यात प्रक्रियेतील तांत्रिक बाबी व आवश्यक कागदपत्रांची माहिती, सरकारी योजना आणि सवलतींचा लाभ घेण्याचे मार्गदर्शन, डिजिटलीकरणाचा शेतीमाल निर्यातीत उपयोग असा होता. प्रमुख प्रशिक्षक श्री. अमरनाथ अंदुरे यांनी विद्यार्थ्यांना आयात - निर्यात प्रक्रियेतील अडचणीवर मात करण्याचे उपाय सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी समजून घेतल्यास आणि योग्य तांत्रिक ज्ञानासह शेती मालाची गुणवत्ता वाढवण्यात भारताच्या कृषी उत्पादनांना अधिक प्रसिद्धी मिळू शकतो असे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यशाळेचे महत्त्वपूर्ण उद्दिष्टे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शेतीमाल व्यापारी ओळख करून देणे त्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करणे आणि त्यांना उद्योजक साठी प्रेरित करणे या उद्देशाने करण्यात आले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात नव नवीन संधी मिळण्याच्या दिशा मिळाली आहे. भविष्यात हेच विद्यार्थी आयात निर्यात क्षेत्रात यशस्वी उद्योजक म्हणून इतिहास रचतील असा विश्वास प्राचार्य डॉ. श्रीराम आरसूळ यांनी व्यक्त केला. तसेच ही कार्यशाळा यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रशिक्षण व रोजगार विभाग प्रमुख प्रा. महेश साबळे आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ. डी. बी. राऊत यांनी महाविद्यालयाच्या या पुढाकाराचे कौतुक केले आणि अशा प्रकारच्या उपकरणामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होईल असे मत व्यक्त केले.
stay connected