स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या -आष्टीकरांचे पोलिस उपअधिक्षकांना निवेदन

स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या -आष्टीकरांचे पोलिस उपअधिक्षकांना निवेदन




 स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईसाठी सतत मागणी करणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील,अन्याय विरुद्ध वेळोवेळी प्रश्न उठवणारे आमदार सुरेश धस,खासदार बजरंग सोनवणे,आ.प्रकाश सोळंके,आमदार संदीप क्षीरसागर यांची काल परळी शहरात चौकशीअंती वाल्मिक कराड याला  मोका मध्ये घेतल्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून नाहक बदनामी करत बीड जिल्ह्यात 144 लागू असतानाही आरोपींच्या बाजूने चुकीच्या पध्दतीने समर्थनात परळी पोलीस स्टेशन येथे चुकीच्या पद्धतीने आरोपीना शिक्षा व्हावी ही सतत मागणी करणाऱ्या नेत्यांच्या प्रतिमेला काळे भासत निषेध व्यक्त करत जोडे मारो आंदोलन करून या निंद प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रकाशित करून अन्यायविरोध आवाज उठवणाऱ्या नेत्यांची नाहक बदनामी केल्यामुळे स्व.संतोष देशमुख हत्तेच्या प्रकरणी अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सर्व सर्वसामान्य लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. काल परळी मध्ये जो निंदनीय प्रकार आरोपीच्या समर्थनार्थ घडला असून सर्व दोषींवर योग्य ती काय कायदेशीर कठोर कारवाई करावी यापुढेही असा प्रकार होणार नाही.या मागणीसाठी आष्टी मतदार संघातील सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येत निषेध व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी संघर्षयोद्धा मनोज जरांगे, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे,आ.प्रकाश सोळंके,आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रतिमेला दुग्धअभिषेक करत स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशा घोषणाबाजी करत अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या नेत्यांना समर्थन दिल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आष्टी पोलीस स्टेशन व आष्टी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांना संबंधितावर कठोर कारवाई करावी या मागणीचे स्वाक्षऱ्या केलेले निवेदन दिले..



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.