कड्यात रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलावरून कोसळली
---------------------------
कारमधील पाचजण सुदैवाने बचावले
-------------------
राजेंद्र जैन / कडा
--------------
मागील दोन वर्षापासून येथील महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने चालू असून, कार चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे पुण्यावरुन बीडकडे जाणारी आयटेन कार पुलावरुन थेट वीस फुट कडी नदीच्या पात्रात कोसळल्याने कारला अपघात झाला. मात्र या भीषण अपघातात कारमधील पाचजण सुदैवाने बालंबाल बचावल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शुक्रवार दि. २४ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान पुण्याहून बीडकडे जात असलेली हुंडाई कंपनीची (एम. एच.१४ एल.ए.५३४१) क्रमांक असलेल्या कार चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कार पुलावरुन थेट वीस फुट कडी नदीच्या पात्रात कोसळली. मात्र या भीषण अपघातात कारमधील पाचजण सुदैवाने बालंबाल बचावल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान घडली. या कारमधील शुभम बाळू गाडे, रा. महाऴूंगे ता.खेड जि. पुणे, महावीर मधूकर घोडके, रा. चिखली ता. खेड जि.पुणे, चेतन कैलास धायवर, रा. देऊगाव ता. आळंदी, ऋषी मोहतार हे पाचजण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने या भीषण अपघातात कुणीही गंभीर जखमी न झाल्यामुळे बालंबाल बचावले आहेत. त्या कारमधील सगळ्या जखमींना अंगत बाजीराव कापरे, रा. रुईनालकोल या तरुणासह इतर ग्रामस्थांनी तत्परता दाखवून नदी पात्रात उतरुन जखमीना मदत केली. सर्व जखमींना येथील खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोकाॅ मजहर सय्यद, पोलीस वाहनचालक प्रताप घोडके, महेश तावरे यांनी तात्काळ धाव घेऊन मदत करीत वाहतूकीची झालेली कोंडी दूर केली.
-------%% ------
अर्धवट रस्ता कामामुळे अपघाताला निमंत्रण
---------------------
आष्टी तालुक्यातील साबलखेड ते चिंचपुर या महामार्ग रस्त्याचे काम मागील दोन वर्षापासून अतिशय कासव गतीने चालू असल्याने हा रस्ता वाहनचालकांसाठी कायम धोकादायक बनल्याने नागरीकांसह वाहनधारक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम जलद गतीने करण्याची मागणी कडा येथील ग्रामस्थांकडून होत आहे.
--------%%----------
stay connected