जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवनात उज्ज्वल प्रगतीची पहाट निर्माण करणे हेच माझे उद्दिष्ट आहे - आ.सुरेश धस
जरेवाडी येथून व्ही.रमणी पॅटर्न चा शुभारंभ..
पाटोदा (प्रतिनिधी) जिल्हा परिषदांच्या शाळांमधून ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी, शेतमजूर आणि ऊस तोडणी कामगार यांची मुले शिक्षण घेत असतात या मुलांच्या जीवनात प्रगतीची पहाट होणे आवश्यक असून जिल्हा परिषद शाळा मधील पहिली ते आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केंद्र शासनाच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान धोरणानुसार आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक टक्केवारी वाढ होण्यासाठी चाचण्या घेण्यात याव्यात आणि विद्यार्थ्यांच्या टक्केवारी चे मूल्यमापन करताना शिक्षकांनी केलेल्या कामाचे निरीक्षण केले जावे जेणेकरून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवलेल्या चांगल्या शिक्षकांचे कौतुक आणि ज्या ठिकाणच्या विद्यार्थी शैक्षणिक टक्केवारी कमी पडेल तिथे शिक्षकांना जबाबदारीची जाणीव करून देणे अशा प्रकारचे शिक्षण पद्धती असणारे जरेवाडी पॅटर्न आणि मागील काळात राबवलेल्या वीरमणी पॅटर्न याचा समन्वय असलेली शिक्षण पद्धती जिल्हा परिषद शाळांमधून राबवावी यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे आणि यापुढे राहील असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले जिल्हा परिषदेच्या जरेवाडी येथील एका विशेष कार्यक्रमांमध्ये ते प्रमुख मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीवने उपस्थित होते पुढे बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की विधानसभा निवडणुकीतील प्रचार कालावधीत माझ्या आष्टी विधानसभा मतदार संघात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी व्ही. रमणी पॅटर्न राबवणार..असे आश्वासन दिले आणि आज तो सुरू होत असल्याचे समाधान आहे असे सांगत
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडे असलेले अशैक्षणिक कामे कमी करून तपालासाठी शिक्षकांनी बीडला जाण्याची आवश्यकता नसून व्हाट्सअप मेसेज द्वारे काम करून शिक्षकांच्या टपाल फेऱ्या बंद कराव्यात जेणेकरून ते पूर्णवेळ शाळेला देतील.मला आठवतंय मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असताना जरेवाडी शाळेची 22 ही पटसंख्या आज 900 पटसंख्या असलेली शाळा झाली आहे.याचे सर्व श्रेय हे या ठिकाणी असलेल्या शिक्षकांना आणि ग्रामस्थांना जाते असे सांगून आ.सुरेश धस म्हणाले की, ऊसतोड मजुरांच्या पाल्य विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे कारण शाळाबाह्य विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत त्यामुळे याचे दुष्परिणाम होऊन शाळेची गुणवत्ता ढासळते शिवाय शिक्षणाचे प्रमाण कमी होते.हे आता कुठेतरी थांबले पाहिजे आणि मला विश्वास आहे माझ्या मतदार संघातील शिक्षक,केंद्रप्रमुख, बीईओ हा बहाद्दर आहे तो जरेवाडी शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येणे आणि 100% विद्यार्थ्यांना गणिताच्या क्रिया येणे हा जरेवाडी पॅटर्न यशस्वी करेल याची मला खात्री असल्याचेही आ.धस म्हणाले.
जिल्हा परिषदेने नामांकित विद्यार्थी घडविले.याचे उत्तम उदाहरण म्हणजे अविनाश साबळे आहे प्रत्येक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती,आणि सरपंचांनी हा पॅटर्न राबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करून प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची पद्धत वेगळी आहे.विद्यार्थ्यांना जे आवडेल त्या पद्धतीने शिक्षकांनी शिकवले पाहिजे असे माझे मत आहे.
ऊसतोड मजुरांची मुले असतील गोरगरिबांची लेकरं, दुर्बल घटकातील मुले शिकली पाहिजे हेच माझे ध्येय असल्याने जिल्हा परिषद शाळेसाठी जे करता येईल ते करण्याची माझी तयारी असल्याचेही धस शेवटी म्हणाले.यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने म्हणाले की जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी सकारात्मकतेने या पद्धतीने शिक्षण द्यावे चांगल्या कामाची दखल घेतली जाईल जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्ता अग्रेसर राहिली यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले
ह भ प मधुकर शास्त्री महाराज,मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, डी आय इ टी संस्था धाराशिवचे प्राचार्य दयानंद जाटनुरे,गटविकास अधिकारी सचिन सानप, गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे,गटविकास अधिकारी संजय केंद्रे,गटशिक्षणाधिकारी यादव गटशिक्षणाधिकारी पिकवणे, राष्ट्रपती व आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक संदीप पवार राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सोमनाथ वाळके, श्रीमती कापसे शिक्षण विस्तार अधिकारी मनोज धस, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किरण शिंदे, जिल्हा परिषद सदस्य माऊली जरांगे, भाऊसाहेब भवर,आदर्श सरपंच संदीप खकाळ व आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी उपक्रमशील व आदर्श शिक्षक व्ही रमणी पॅटर्नमध्ये यशस्वी काम केलेले सर्व शिक्षक शिक्षिका जरेवाडी डोंगर किनी अमळनेर व परिसरातील सुजाण पालक वर्ग तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्हारी शिंदे यांनी केले.
stay connected