बोगस खरेदीखत करून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी
मौजे मोराळा ता. आष्टी जि. बीड येथील रहीवाशी सुर्यकांत गर्जे यांची शेती मौजे मोराळा येथील जुना स.नं. १७४ ज्याचा नवीन स. नं ७८ मध्ये स्वमालकीची जमीन आहे. सदर जमीनीमध्ये प्रल्हाद बागोजीराव गर्जे व रघुनाथ बागोजीराव गर्जे यांच्या नावाची पेरफार नं ६६१ नुसार चुकीची नोंद झालेली आहे, त्या चुकीच्या नौंदी आधारे त्याचे वारस नौंद झालेली आहे. सदर नोंदीचा गैरफायदा घेऊन त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय आष्टी येथे येवुन बोगत खरेदीखत नोंदवले आहे. अशी माहिती सुर्यकांत गर्जे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी आष्टी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केली आहे . निवेदनात ते पुढे म्हणाले की
दि. २९ - १२ - २०२४ रोजी दुपारी १००० वा. चे सुमारास मी माझा शेतात गेलो असतांना प्रल्हाद बागोजीराव गर्जे मिराबाई बाळासाहेब पनवे है दोघे अनाधिकाराने माझ्या देशात आले व मला म्हणाले की, तुझा या जमीनीशी काही संबंध नाही. येथे पुन्हा आलास तर जिवे मारू असे म्हणून मला मारहाण केली . मला यापुढे आमचे नादी लागल्यास जीवे मारू अशी धमकी दिली. या आडदांड व गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून माझ्या व माझ्या कुटूंबियांच्या जिवीतास धोका आहे . तरी त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग, आष्टी यांच्याकडे सुर्यकांत बाबासाहेब गर्जे यांनी निवेदनाद्वारे केली आहे
stay connected