तरुणाकडे सापडली बंदूक
आष्टी पोलिसात गुन्हा दाखल
आष्टी ता.९ (प्रतिनिधी)- तालुक्यातील बीडसांगवी येथील २५ वर्षीय तरुणाकडे बंदूक सापडल्याने आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे. सदरील तरुणा विरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.नागेश परमेश्वर बोबडे असे तरुणाचे नाव आहे.
आष्टी पोलिसांना बुधवारी (ता.८) बीडसांगवी येथील नागेश परमेश्वर बोबडे यांचे जनावरांच्या गोठ्यात बंदुक आहे अशी माहिती मिळालेवरून आष्टी पोलिसांनी दोन पंचाना सोबत घेऊन सदरील ठिकाणी जाऊन छापा मारला असता नागेश परमेश्वर बोबडे (वय २५) रा. बीडसांगवी ता. आष्टी जि. बीड
यांच्या गोठ्यात बंदूक आढळून आली.
पोलिस अमलदार बब्रुवान अभिमान वाणी यांच्या फिर्यादीवरून बुधवारी (ता ८) आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत हिंगे हे करत आहेत.
stay connected