काव्यवाचन मध्ये भालेराव व मोहिते यांना विभागून प्रथम तर वक्तृत्व मध्ये उशिरे व भांड यांना प्रथम क्रमांक विभागून.
आष्टी (प्रतिनिधी) :- येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा आष्टी - पाटोदा - शिरूर चे मा. आ. भीमराव धोंडे यांच्या आई - वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ भगवान महाविद्यालय आष्टीच्या वतीने आयोजित गंगाई - बाबाजी महोत्सवातील आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत महेश उशीर (न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर) व गोविंद भांड (बी.जी.एस. महाविद्यालय, पुणे) यांनी प्रथम क्रमांक विभागून (रोख ७००१ रुपये, सन्मानचिन्ह) तर द्वितीय क्रमांक अनिकेत डमाळे (न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर) व प्रमोद भालेराव (गोखले इन्स्टिट्यूट, पुणे) यांना विभागून (५००१ रुपये व सन्मानचिन्ह) तर तृतीय क्रमांक आकाश बोडखे (मालपाणी महाविद्यालय, संगमनेर) व स्वाती पोकळे (पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, आष्टी) यांना विभागून (रोख ३००१ रुपये व सन्मानचिन्ह) देण्यात आले
वक्तृत्व स्पर्धेसाठी १) शेतकऱ्यांच्या मुलांचे लांबलेले विवाह..एक सामाजिक समस्या, २) नीती मूल्यांचा वाढता ऱ्हास आणि सामाजिक जीवन, ३) ईव्हीएम वरील मतदारांच्या मनातील वाढती साशंकता हे विषय देण्यात आले होते. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. अनिल गर्जे, डॉ. राजाराम सोनटक्के, व डॉ. गोपीनाथ बोडखे यांनी काम पाहिले.
आंतर महाविद्यालयीन काव्यवाचन स्पर्धेत प्रमोद भालेराव (गोखले इन्स्टिट्यूट, पुणे) व आकाश मोहिते (न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर) यांना प्रथम क्रमांक विभागून (
रोख ७००१ रुपये व सन्मानचिन्ह) सृष्टी लोखंडे (एम.पी. लॉ कॉलेज, छत्रपती संभाजीनगर) व राजश्री जाधव (कालिका देवी महाविद्यालय, शिरूर) यांना द्वितीय क्रमांक विभागून (रोख ५००१ रुपये व सन्मानचिन्ह) तर तृतीय क्रमांक आकाश बोडके (मालपाणी महाविद्यालय, संगमनेर) व गोविंद भांड (बी.जी.एस. महाविद्यालय, पुणे) यांना विभागून (रोख ३००१ रुपये व सन्मानचिन्ह) देण्यात आले
काव्यवाचन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. नागेश शेलार, डॉ. अभय शिंदे, अनिल गर्जे यांनी काम पाहिले. स्पर्धेनंतर प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ, प्रा. डॉ. अनिल हजारे, परीक्षक नागेश शेलार, डॉ. राजाराम सोनटक्के, अभय शिंदे, डॉ. अनिल गर्जे यांच्या हस्ते स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रा. डॉ. अनिल हजारे तर काव्यवाचन स्पर्धेसाठी प्रा. डॉ. दिगंबर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शुक्रवार दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी १० ते १ व दुपारी २ ते ५ अशा दोन सत्रांमध्ये संस्था अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
stay connected