*रयत शैक्षणिक संकुल सात्रळचा यशराज सिनारे वक्तृत्व स्पर्धेत प्रथम*
सात्रळ-(वार्ताहर) राहुरी तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय सात्रळ येथील इयत्ता ५ वी मध्ये शिकणारा यशराज मोहन सिनारे हा रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी अंतर्गत विभागीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये यशराज सिनारे याने लहान गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग अहिल्यानगरच्या विभागांतर्गत वक्तृत्व,गायन आणि प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते.
या स्पर्धेसाठी उत्तर विभागातून
नगर, नाशिक,धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमधून अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यशस्वी विद्यार्थ्यांला विभागप्रमुख प्राजंली फरकाडे, जेष्ठ शिक्षक त्रिंबक राशीनकर, सच्चिदानंद झावरे,वर्गशिक्षक वैभव वसावे, विलास गभाले,गितांजली गोसावी,प्रकाश कुलथे,देवीदास थोरात, सुदर्शन गिते, ज्ञानदेव लेंडे,प्रविणाताई दिघे, सतिश नालकर,केशव मुसमाडे,भारत कोहकडे,संजय दिघे,युनूस पठाण,संगिता सांगळे,सुनिता ढोकणे,कावेरी वदक,संगिता वाघचौरे,पल्लवी गावडे,आदिंचे मार्गदर्शन लाभले.
यशराजने यश प्राप्त केल्याबद्दल त्याचा २६ जानेवारीला रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थ्याचे व मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे सहाय्यक अधिकारी प्रमोद तोरणे व बाबासाहेब नाईकवाडी, गुणवत्ता कक्षाप्रमुख काकासाहेब वाळुंजकर,प्रगती पतसंस्थेचे चेअरमन ॲड विजयराव कडू पाटील, स्कूल कमिटीचे अध्यक्ष संभाजीराव चोरमुंगे,शांतीभाऊ गांधी, बबनराव कडू पाटील,डॉ के.के.बोरा, भास्करराव फणसे, युवानेते किरणदादा कडू पाटील, पंकजदादा कडू, विक्रांतदादा कडू, योगेशचाचा चोरमुंगे,विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र बडे पर्यवेक्षिका सुशिला थोरात तसेच शिक्षक,पालक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
stay connected