पिक अपला भरधाव आयशरची धडक चालकाचा मृत्यू
आष्टी ता.३ (प्रतिनिधी)- तालुक्यातील कऱ्हेवाडी येथील शेतकरी पुणे येथे कांदा विक्रीसाठी घेऊन जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव आयशरने जोराची धकड दिल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता.३) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास यवत (जी पुणे) येथे घडली. या घटनेने कऱ्हेवाडी गावावर शोककळा पसरली. बाळासाहेब पोपट सांगळे (वय वर्षे ४०) असे मयत चालकाचे नाव आहे.
शुक्रवारी कऱ्हेवाडी येथुन पुणे येथे कांदा विक्रीसाठी पीक अप ने (MH 23 W 3766) जात असताना यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिक अप चे टायर पंक्चर झाले होते. चालकाने पंक्चर काढून पीक अप मध्ये बसण्याच्या तयारीत असतानाच पाठीमागून आलेल्या भरधाव आयशर ने जोराची धडक दिली. यामध्ये चालक बाळू पोपट सांगळे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी यवत पोलिस दाखल होत जखमी चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु चालकाचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती कऱ्हेवाडी व कऱ्हेवडगांव येथील तरुणांना समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.यवत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन गावी कऱ्हेवाडी येथे दुपारु शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाश्च्यात्य दोन मुलं, पत्नी, आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
stay connected