मस्साजोग प्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे, पण यामध्ये कोणी राजकारण आणू नये - माजी आ.भीमराव धोंडे

 मस्साजोग प्रकरणातील  गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे, पण यामध्ये कोणी राजकारण आणू नये - माजी आ.भीमराव धोंडे

----------------------------------------



----------------------------------------

आष्टी (प्रतिनिधी ) 

   बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील  गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे, पण यामध्ये कोणी राजकारण आणू नये असे मत माजी आ. भीमराव धोंडे यांनी व्यक्त केले.

          मस्साजोग प्रकरणी माजी आ.भीमराव धोंडे यांना कडा येथे पत्रकारांनी विचारले असता त्यांनी आपले मत व्यक्त केले.याविषयी पुढे  बोलताना धोंडे म्हणाले की, गुन्हेगाराला कोणतीही जात-पात नसते.गुन्हेगार हीच त्याची जात असते.ज्या पद्धतीने सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण  हत्या झाली आहे ते अत्यंत दुर्दैवी घटना आहे.  माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. यामध्ये सहभागी असणाऱ्या गुन्हेगारांना मग ते कोणीही असोत त्यांना कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे असे आपले स्पष्ट मत असल्याचे माजी आ.भीमराव धोंडे यांनी सांगितले. 

    पुढे बोलताना माजी आ. भीमराव धोंडे म्हणाले की, याविषयी कोणी राजकारण करत असेल तर ते करू नये राजकारणासाठी वेगवेगळे अनेक व्यासपीठ आहेत‌.विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण करण्यात यावे परंतु अशा संवेदनशील विषयांमध्ये राजकारण करून समाजा - समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी कोणतेही वक्तव्य अथवा कृती कोणाकडूनही होऊ नये कारण गुन्हेगाराला कोणत्याही समाजाचे कधीच पाठबळ नसते, त्यामुळे त्यांच्या गुन्हेगारी कर्तव्याला कोणताही समाज जबाबदार नसतो.काही गुन्हेगारांच्या कृतीमुळे समाजा -समाजामध्ये दुरावा निर्माण करणे ही चांगली बाब नाही.

-----------




गेल्या काही दिवसांपासून  मीडियावर बीडचा बिहार होतोय अशा आशयाच्या बातम्या झळकवल्या जात आहेत अशा बातम्यांमुळे  बीड जिल्ह्याची राज्यभर नव्हे तर देशात बदनामी होत आहे. ती कृपया थांबवावी. अशा बातम्यांना खतपाणी घातले जाणार नाही याची जिल्ह्यातील राजकीय लोकांनी दक्षता घ्यावी अशी सूचनाही माजी आ. धोंडे यांनी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात सी.आय.डी.,एस.आय.टी.नेमलेली आहे‌ तसेच गुन्हेगारांना मोकका लावला आहे. संबंधित यंत्रणेवर सर्वांनी विश्वास ठेवावा विना हस्तक्षेपाचे त्यांना काम करून द्यावे असे भीमराव धोंडे यांनी सांगितले.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.