न्यायालयीन लढाईची रणनीती ठरवणार
*किसानपुत्र आंदोलनाचे जालन्यात शिबीर*
जालना-
11 व 12 जानेवारी 2025 रोजी, जालना येथील कृषी विज्ञान केंद्र येथे किसानपुत्रांचे राज्य स्तरीय चिंतन शिबीर होणार आहे. या शिबिरात शेतकरी स्वातंत्र्यासाठी न्यायालयीन लढाईची दिशा या विषयावर चर्चा होणार आहे.
या शिबिरात ऍड सागर पिलारे (कोल्हापूर) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. विजय आण्णा बोराडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून या शिबिरात ऍड सुभाष खंडागळे (पुसद), श्री अमृत महाजन (आंबाजोगाई), ऍड महेश गजेंद्रगडकर (पुणे), डॉ विकास सुकाळे (नांदेड), श्री सतीश देशमुख (पुणे), डॉ प्रशांत शिनगारे (पुणे), अनंत देशपांडे (लातूर), डॉ राजीव बसर्गेकर (मुंबई) व अमर हबीब (आंबाजोगाई) हे विविध विषयांची मांडणी करणार आहेत.
शिबिराला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून 40 ते 50 शिबिरार्थी भाग घेणार आहेत.
stay connected