जि. प. प्रा. शा. जळगांवचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

 *जि. प. प्रा. शा. जळगांवचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.* 



आष्टी। प्रतिनिधी 

जि. प. प्रा. शा. जळगाव शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन जळगावचे सरपंच श्री पोपट गोंड यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र शेंडे, केंद्र मुख्याध्यापक पाचारणे, शिक्षकप्रेमी डी . एस .राऊत  व काशिनाथ गदादे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक  संदीप औटे यांनी केले . त्यांनी यावेळी स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे रूपरेषा मांडली तर सहशिक्षक अमोल कदम यांनी शाळेने वर्षभर राबवलेल्या शैक्षणिक उपक्रमांची रुपेरेषा मांडली. शालेय स्थापनेपासूनच्या इतिहासामध्ये प्रथमच जि . प्रा . शा . जळगाव शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन प्रथमच संपन्न झाला. या प्रशालेच्या १ली ते ४च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमांमध्ये सोशल मीडियाचा अतिवापर व त्याचे दुष्परिणाम, , गीत , शूरमर्दानी लाठीकाठी पर्यंतच्या सर्व कला गुणांना या कार्यक्रमांमध्ये स्थान देण्यात आले होते. स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्कृष्टरीत्या सादर केल्याबद्दल मान्यवरांनी सर्वांचे कौतुक केले . सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहशिक्षक अमोल कदम यांनी केले .यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक व शिक्षकप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.