कडा ग्रामपंचायत सदस्या सौ. कमलाबाई सुमतीलाल भंडारी निधन
----------------------------
कडा / वार्ताहर
--------------
येथील ग्रामपंचायत सदस्या सौ. कमलाबाई सुमतीलाल भंडारी यांचे शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे (वय-७२) होते.
दिवंगत सौ. कमलाबाई भंडारी यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, जावाई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील स्मशानभूमीत शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी राजकीय,सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होेते. कडा कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक योगेश भंडारी यांच्या त्या मातोश्री होत्या. भंडारी कुटूंबियांवर कोसळलेल्या दु:खात तेजवार्त परिवार सहभागी आहे.
----------%%----------
stay connected