*राज्यस्तरीय निबंध स्पर्धा*
अहिल्यानगर (प्रतिनिधी) - सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या असून स्पर्धेसाठी 1000 शब्दापर्यंत हस्तलिखित निबंध, परिचय, फोटो पाठवावा असे आवाहन स्पर्धा प्रमुख सुभाष सोनवणे व प्रा.डॉ.अनिल गर्जे यांनी केले आहे.
फेब्रुवारी मध्ये अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये नवोदित लेखक कवी, विदयार्थी यांचा सहभाग वाढवणे साठी या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेसाठी "वर्तमानातील मराठी भाषा आव्हाने आणि उपाय" हा विषय निश्चित करण्यात आलेला आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट निबंधकारांना संमेलनामध्ये पारितोषिक वितरण करण्यात येईल.
त्यासाठी आपले स्व हस्ताक्षरातील तीन ते चार पानी निबंध, परिचय,फोटो व पोस्टाची रुपये पाचची पाच तिकिटे शब्दगंध साहित्यिक परिषद, फुलोरा,लक्ष्मी कॉलनी, भिस्तबाग महालाजवळ, तपोवन रोड, सावेडी, अहमदनगर 41 40 03 या पत्त्यावर पाठवावें,असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप राहणार असून नवोदितांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा,असे आवाहन शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे,उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.जी.पी ढाकणे, कार्यवाह भारत गाडेकर, सहकार्यवाह प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर, स्वाती ठूबे,शर्मिला गोसावी,राजेंद्र पवार, रवींद्र दानापुरे, प्रशांत सूर्यवंशी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 99 21 00 97 50 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.
stay connected