आ.सुरेश धस यांचा आदेश,
अन प्रशासन गावच्या पारावर...
*******************************
शेतकऱ्यांकडून समाधान आणि आभार व्यक्त..
********************************
*******************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी,पाटोदा, शिरूर मतदार संघातील शेतकरी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच ग्रामपंचायत स्तरीय विशेष मदत शिबिरे आयोजित करण्याच्या प्रशासनाला दमदार आमदार मा.सुरेश धस यांनी आदेश देताच आष्टी तालुक्यातील तहसीलदार,तालुका कृषी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांना दिलेल्या सुचनेनुसार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना,केंद्र शासन व नमो किसान सन्मान योजनेतील अपात्रते संबंधी असणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून गावोगावी नेमून दिलेल्या तारखांना गावच्या पारावर शिबीरे घेतली जात आहेत.
विधानसभा निवडणुकीमध्ये भरघोस मताधिक्य घेऊन निवडून आलेल्या आणि सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या आ.सुरेश धस यांनी मतदारसंघातील विकास कामासह प्रशासनातील सर्वसामान्याला येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी गावोगावी पारावर जाऊन सोडवाव्यात असे आदेश दिल्याने गावातील पारावर प्रशासनातील तहसीलदार वैशाली पाटील, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे व गटविकास अधिकारी सचिन सानप यांनी विशेष मदत शिबिरे घेऊन पी.एम.किसान लाभार्थ्यांची ई-केवायसी नसणे,लँड सिंडींग नसणे, लाभार्थी अनट्रेसेबल असणे व इतर अनुषंगिक बाबींची पूर्तता या कॅम्पच्या माध्यमातून अपात्रते संबंधित असणाऱ्या अडचणी सोडवल्या आहेत.आष्टी, पाटोदा, शिरूर मतदार संघात प्रशासनामार्फत विशेष मदत शिबिरे दि.20 ते 24 जानेवारीपर्यंत राबवले जाणार असून या कालावधीत प्रशासन शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना,केंद्र शासन व नमो किसान सन्मान योजनेत अपात्र व या संदर्भात असणाऱ्या अडचणीचे निरसन करण्याचे काम करत आहे. या मदत शिबिरात शेतकऱ्यांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद असून या अभिनव उपक्रमाचे शेतकऱ्यांकडून आमदार सुरेश धस यांनी गावोगावी आयोजित केलेल्या शिबिरांमध्ये समस्या सुटल्या बद्दल शेतकरी नागरिकांनी समाधान व्यक्त करून आमदार सुरेश धस यांचे आभार मानले आहेत.आभार मानले जात आहेत. दिलेल्या कालावधीमध्ये नमो किसान योजनेअंतर्गत वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी या या ग्रामपंचायत स्तरीय विशेष मदत शिबिराचा लाभ घेण्याचे व आपल्या समस्या सोडण्याचे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले.
चिखली येथे सामाजिक कार्यकर्ते गणेश शिंदे, शिवाजी आवारे, शांतीलाल घोलप,अंकुश आवारे, अंगत शिंदे यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,प्रमुख पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी,कर्मचारी, ग्रामस्थ या विशेष मदत शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित होते
stay connected