पंतप्रधान घरकुल आवास योजनेचा मंजूर लाभार्थ्यांनी कागदपत्राची पूर्तता करून लाभ घ्यावा Suresh Dhas

 पंतप्रधान घरकुल आवास योजनेचा मंजूर लाभार्थ्यांनी कागदपत्राची पूर्तता करून लाभ घ्यावा
--------आ.सुरेश धस


******************************



*****************************

आष्टी,पाटोदा,शिरूर कासार या तिन्ही तालुक्यात पंतप्रधान घरकुल आवास योजना-ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत ११ हजार ९०० लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाले आहेत.

गावनिहाय ग्रामपंचायत समोर मंजूर झालेल्या लाभार्थी यांच्या याद्या लावल्या असून लाभार्थ्यांनी ग्रामसेवक किंवा ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्याकडे आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले आहे.



पंतप्रधान घरकुल योजना-ग्रामीण टप्पा -२ अंतर्गत घरकुल मंजुरी व पहिला हप्ता वितरणाचे काम हाती घेतले.प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुले मंजूर झाले असून मंजूर लाभार्थ्यांच्या मतदारसंघातील गावनिहाय यादी ग्रामपंचायत कार्यालयासमोर लावण्यात आली आहे.यामध्ये आष्टी ६१५७,पाटोदा २९०२,शिरूर कासार २८०५ तिनी तालुक्यात घरकुले मंजूर झाले असून त्या यादीतील लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.यासाठी ग्रामपंचायतचा जागा उपलब्धेप्रमाणे पीटीआर किंवा सातबारा,आधार बँक पासबुक या आवश्यक कागदपत्राची पूर्तता संबंधित गावातील ग्रामसेवक किंवा ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्याकडे दोन दिवसात करावी. तात्काळ पुढच्या आठवड्या पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा केले जाणार आहे. घरकुल यादीत दिलेल्या लाभार्थ्यांनी नियमाप्रमाणे कागदपत्रे दोन दिवसात जमा कराव्यात म्हणजे ऑनलाइन प्रणाली मार्फत घरकुल मंजुरी व लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाचा हप्ता वितरण जमा जाणार असल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.