कुंभमेळ्यात गेलेल्या निष्पाप बळीचे काय?धर्माच्या नावावर किती लोकांचे बळी घेणार?कुंभमेळा की मृत्यूमेळा?-डॉ जितीन वंजारे

 *कुंभमेळ्यात गेलेल्या निष्पाप बळीचे काय?धर्माच्या नावावर किती लोकांचे बळी घेणार?कुंभमेळा की मृत्यूमेळा?-डॉ जितीन वंजारे*



       काल परवा कुंभ मेळ्यात झालेल्या चेंगरा चेंगरीत शेकडो लोक मेली, दहा हजार कोटी रुपये खर्चूनपण योग्य नियोजना अभावी आणि व्ही आय पी कल्चर राबवल्याने तेथे अस्थेने गेलेल्या निष्पाप प्रानांची आहुती गेली, दोन जागेवर चेंगरा चेंगरी झाली शेकडो लोक मेली पण सगळं झाका-झाकी चालू आहे.गुलाम मीडिया मृत्युंचा आकडा कमी दाखवत आहे, मेलेल्या माणसांचे गायब झालेल्या माणसांचे दुःख कोणी दाखवायला तयार नाहीत स्वतःचा बाप माय बहीण भाऊ मेला तर असे गप्प राहाल का? गुलामी स्वीकारून किती पाप करणार आहात अक्खा मीडिया गुलाम झाला आहे शेठ ला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न चालू आहेत.गंगामैया तुम्हाला माफ करणार नाही.बीजेपी योगी मोदी दोघंही फेल साबित झाले आहेत,तुम्ही केलेल्या पापामुळे तुमच्याच घरातील असच माणूस चेंगरून मरेल आणि तुमच्या हातून झालेलं पाप कधीही भरून निघणार नाही. देशात केवळ धर्माच्या नावावर लुटालूट चालू आहे. विमानाचे भाडेवाढ, रेल्वेचे भाडेवाढ झाली असून प्रयागराजला जाण्याचे प्रवास दर अगदी वीस पट वाढवले आहेत तरी सरकार गप्प आहे. यावर नियंत्रण करण्याची हिम्मत येथील सरकारमध्ये नाही कारण ते उद्योजकांणी विकत घेतलेले भाडेकरू आहेत.कुंभ मेळ्याच्या जाहिराती करुन लोक बोलावली गेली आणि त्यांची फसवणूक केली,व्ही आय पी लोकांना स्पेशल मार्ग बनवून त्यांना स्वतंत्र्य जागा आणि रस्ता दिल्यामुळे जागा अपुरी पडली लोकांना पाय ठेवायला जागा नाही, गर्दी मुळे स्वास घ्यायला ऑक्सिजन नाही मिळाल्याने बरेच रुग्ण आणि चेंगरा-चेंगरी करून लोक तुडवली गेली यात शेकडो लोक मारले गेले, बिचारे धर्माच्या अस्थेच्या नावावर आले होते भोळे भाबडे लोक मोक्ष मिळावा म्हणून आले होते पण त्यांच्या पदरी सरकारच्या अपुऱ्या व्यवस्थे अभावी मोक्ष ऐवजी मृत्यू आला हे दुर्भाग्य मग त्यांना सरकारी पैसा खर्चून जिवंत मारायला मोदी आणि योगी सरकार ने बोलावले होते काय? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केला आहे.



            लोक कुंभ मेळ्याची जारीराती करून बोलावली गेली त्यांना चोख नियोजनाच अमिश दाखवून गर्दी जमवली खरी पण नियोजनअभावी सगळे कुसळ केरात घातले अशी परिस्थिती आहे. पालघर मध्ये दोन साधूंची हत्या झाली तेंव्हा राजकीय सूड उगारून त्या काळाच्या ठाकरे सरकार मधून काही धर्माचे वाटेकरी बाहेर पडून आपलं स्वतंत्र्य सरकार करू अशी व्हलगणा करून शिवसेना फोडणारे नेते आता मूग खाऊन गप्प आहेत, दोन साधूच्या हत्तेवरून महाराष्ट्र सरकार पाडलं पक्ष फोडले काहींचे बेगड हिंदुत्व समोर करून पक्ष फोडले मग आता इतके लोक मेली तरी गुलामासारखं शांत राहणारे नेते आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? आता बोला ना सरकार विरोधात आता पाडा सरकार व्हा वेगळे पण नाही स्वतःची टीमकी भरली की देश देव धर्म चुलीत घालणाऱ्या नालायक औलादी इथे आहेत आणि म्हणून धर्माच्या नावाखाली सत्तेचा अघुरा खेळ खेळणाऱ्या लोकांपासून सामान्य नागरिकांनी अलिप्त राहायला हवं. गंगा स्नान घरी करा, घरच्या आई बापाला जपा, त्यांचा संभाळ नीट करा तिथेच कशी तिथेच कुंभमेळा भेटेल उगाच नेत्याच्या नादी लागून घर सोडू नका. मन में गंदा.... तो क्या करे गंगा....., बाह्य स्नानाणे अंतरमन साफ होत नाही त्याला साफ नियत,स्वच्छ मन,दुसऱ्याप्रति चांगली भावना आणि माणुसकी लागते कुठे कशी गंगा कुंभमेळा करायची गरज नाही. आपल्या अस्थेचा, श्रध्येचा कोणी गैर वापर करत असेल तर कोणाच्या प्रलोभणाला अमिषाला बळी पडू नका. जीव धोक्यात घालून अश्या गर्दीत जाऊन स्वतःच्या कुटुंबाला आणि स्वतःला पोरक करू नका. सरकार इतकं खोटं निकम्म आणि बे भरवश्याच आहे हे आता सिद्ध झालं आहे अल्लू अर्जुन च्या चित्रपट रिलीज दरम्यान एक महिला चेंगरून मृत्यूमुखी पडली त्यावर रणसंग्राम करून त्याला जेल मध्ये पाठवणारे भडवे इतके शेकडो लोक मेले तर त्या कुंभमेळा अधिकारी आणि सरकार वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून मोदी आणि योगी चा राजीनामा का नाहीत मागत? मीडिया आता गप्प का? धर्माचे ठेकेदार कोणत्या बिळात आहेत? त्यांना ऍम्ब्युलन्स मिळत नाही हजारो लोकांचे प्रियजन विखरले आहेत, परिवार सदस्य मेले हरवले की गायब झाले का त्यांचा खून झाला ह्याचा कोणाला ताळमेळ नाही मग दहा हजार करोड रुपये खर्चून उभा केलेली यंत्रणा फक्त पैसे खाऊन गप्प झाली की काय? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते मा. सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केला आहे.



         प्रयागराज ला मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना मोक्ष प्राप्त झाला असा ढोबळ आदेश काढून स्वतः व्ही आय पी कल्चर मधून व्ही व्ही आय पी दर्शन घेणारे काही स्वयंघोषित बाबा सावरा सावर करतील पण ज्याच्या घराचा दिवा विझला, ज्याच्या घराचा कर्ता माणूस गेला, कोणाचा भाऊ कोणाचा पती कोणाची पत्नी गेली त्यांचं काय? चेंगराचेंगरीत मेलेल्याना मोक्ष मिळतो म्हणाऱ्या बाबा ला जिवंत पाण्यात समाधी घ्यायला पाहिजे. लोकांची घर उध्वस्त करण्याचा यांना कोणी अधिकार दिला. अरे कोणाचे कपडे, कोणाचे पैसे आणि माणसं हरवले परत यावं की तिकडंच मरावं हेही त्यांना कळेना अशी परिस्थिती आहे. तिथे आपण स्वतः आहात असे राहून विचार करा मग धर्माच्या आणि सत्तेच्या पैश्याच्या जोरावर व्ही व्ही आय पी कल्चर तयार करणाऱ्या योगी आणि मोदी सरकार ची किती मोठी चूक झाली आहे हे कळेल. सरकार चा पैसा लाटून सामान्य लोकांना सुविधा न देता हे फक्त सुटा बुटा वाल्यांचच सरकार आहे हे आजही पुन्हा एकदा सिद्ध झालं. तुमचे कर्माचे फळ तुम्ही नक्कीच भोगसाल. देवाघरी उशीर नक्की असेल पण पण न्याय नक्की होईल.भोळ्या भाबड्या लोकांचा अस्थेचा, श्रध्येचा, विश्वासाला तडा तुम्ही दिला. कुंभ मेळा फक्त श्रीमंताचाच आहे त्यांना सगळं आहा से आहा तक आणि गरिब चेंगरून मारणाऱ्याला जेल मध्ये टाका इतकच....!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.