पंतप्रधान घरकुल आवास योजना, मंजूर लाभार्थ्यांनी दोन दिवसात कागदपत्राची पूर्तता करावी.. -------- गटविकास अधिकारी, सचिन सानप

 पंतप्रधान घरकुल आवास योजना, मंजूर लाभार्थ्यांनी दोन दिवसात कागदपत्राची पूर्तता करावी. ---- गटविकास अधिकारी, सचिन सानप



आष्टी (प्रतिनिधी)

आष्टी तालुक्यात पंतप्रधान घरकुल आवास योजना-ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत.. लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाले आहेत.

गावनिहाय ग्रामपंचायत कार्यालया समोर मंजूर झालेल्या लाभार्थी यांच्या याद्या लावल्या असून लाभार्थ्यांनी ग्रामसेवक किंवा ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्याकडे येत्या दोन दिवसांत आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करून या योजनेचा लाभ घ्यावा ..आणि मार्च अखेपर्यंत घराचे बांधकाम पूर्ण करावे असे आवाहन आष्टी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी

डाॅ.सचिन सानप यांनी केले आहे 



याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, आ.सुरेश धस अण्णा यांनी प्रयत्नपूर्वक आष्टी तालुक्यामध्ये अनेक गावातील लाभार्थ्यांसाठी 

पंतप्रधान घरकुल योजना-ग्रामीण टप्पा -२ अंतर्गत घरकुल मंजुरी व पहिला हप्ता वितरणाचे काम हाती घेतले आहे.. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुले मंजूर झाले असून मंजूर लाभार्थ्यांच्या मतदारसंघातील गावनिहाय यादी ग्रामपंचायत कार्यालयासमोर लावण्यात आली आहे.यामध्ये आष्टी तालुक्यात  ६१५७  घरकुले मंजूर झाले असून  यादीतील लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

यासाठी 




1) ग्रामपंचायतचा जागा उपलब्धेप्रमाणे पीटीआर किंवा सातबारा,

2) आधार बँक पासबुक या आवश्यक कागदपत्राची पूर्तता संबंधित गावातील ग्रामसेवक किंवा ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्याकडे येत्या दोन दिवसात करावी.  पुढच्या आठवड्या पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या हप्त्याचे अनुदान जमा केले जाणार आहे. घरकुल यादीत दिलेल्या लाभार्थ्यांनी नियमाप्रमाणे कागदपत्रे दोन दिवसात जमा करावेत म्हणजे ऑनलाइन प्रणाली मार्फत घरकुल मंजुरी व लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाचा पहिला  हप्ता जमा होणार असून या घरकुलांचे बांधकाम मार्च 2025 अखेर पूर्ण करावे याबाबत माननीय आमदार सुरेश धस अण्णा यांनी याबाबत बैठकीमध्ये निर्देश दिलेले आहेत त्यानुसार सर्व लाभार्थ्यांनी दोन दिवसात कागदपत्र जमा करून पहिला हप्ता पदरात पडून घ्यावा आणि बांधकाम सुरू करून उर्वरित अनुदान प्राप्त करून घ्यावे आणि 31 मार्च 20 25 पूर्वी घरकुलाची बांधकाम पूर्ण करण्यात यावे असे आवाहन ही  गट विकास अधिकारी डाॅ.सचिन सानप यांनी केले आहे



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.