पुण्यभूमी प्रयाग राज महाकुंभमेळ्याला आष्टीच्या पत्रकारांची उपस्थिती व गंगास्नान
-----------------------------
धार्मिक,ऐतिहासिक स्थळ पाहणीने संशोधनाला संधी
-----------------------------
-----------------------------
आष्टी (प्रतिनिधी)
सनात वैदिक प्राचीन प्रथेप्रमाणे कुंभमेळा हा उत्सव महत्त्वपूर्ण असून या वर्षीचा हा महाकुंभमेळा १४४ वर्षानंतर आलेला आहे.त्यामुळे या महाकुंभाला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे या पर्व काळामध्ये पवित्र गंगा स्नान करण्याचे निश्चित करून आष्टीच्या पत्रकार संघाने प्रयागराज दौरा आयोजित केला.गंगा,यमुना आणि लुप्त असलेल्या सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर सर्व पत्रकारांनी पवित्र गंगा स्नान केले.यावेळी संपुर्ण भारत विविध राज्यातील विविध पारंपारिक वेशभूषांमध्ये अनेक राज्यातील भाविक भक्त उपस्थित होते.या अभूतपूर्व जनसमुदायाला उपस्थितीमुळे या पवित्रक्षेत्री मोठ्या प्रमाणावर भाविकांची अध्यात्मिक ओढ दिसून आली.त्यामध्ये वयोवृद्ध मध्यम आणि विशेषतः महाविद्यालयीन तरुण तरुणींची ही लक्षणीय संख्या दिसून आली.१४४ वर्षानंतर आलेल्या या अपूर्व योगावर पुण्य प्राप्ती करून घेण्यासाठी या पिढीतील सर्वांचीच धडपड दिसून आली. कारण आपल्या या पिढीला पुन्हा ही संधी निर्माण होणार नसल्याने भाविकांनी गर्दी केली आहे.धर्माचा राजमुकुट, पुण्यभूमी प्रयाग राज येथील या त्रिवेणी संगमाच्या परिसरात खाजगी वाहनांना बंदी असल्यामुळे भाविकांना सुमारे १० किलोमीटर अंतर चालावे लागत आहे.सर्व वयोगटातील भाविक भक्त कोणतीही तक्रार न करता केवळ गंगास्नानासाठी आतुर झालेले दिसून येत होते. प्रयागराज येथील विविध आखाड्यांमधील पदाधिकारी आणि त्यांचे भक्तगण अध्यात्मिक वातावरणात लीन होऊन गेलेले दिसून येत होते. विशेषतः हिमालय पर्वतराजीत वास्तव्यास असणाऱ्या नागा साधूंचे दर्शन घेण्याचाही योग आष्टीच्या पत्रकारांना आला.हे सर्व साधू आपापल्या ब्रह्मानंदी अवस्थेत दिसून आले.त्यांचेही आशीर्वाद या निमित्ताने घेता आले.या महाकुंभासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आणि प्रशासनाची सर्व भाविक भक्तांची व्यवस्था करताना कसोटी लागलेली दिसून येत होती.
धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ पाहणीमुळे संशोधनाला संधी
--------------
महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी आहे; किंबहुना हिंदुस्थानच्या विविध राज्यांमध्येही धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांची फार मोठी उपलब्धता असून या स्थळांना आवर्जून भेट देण्याचा योग आष्टी तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांना सहल प्रसंगी येत आहे. यातून संशोधनाची मोठी संधी प्राप्त झाल्याचे सहल दरम्यान माध्यमांशी बोलताना पत्रकार उत्तम बोडखे म्हणाले.
गंगा यमुना आणि गुप्त सरस्वती अशा देशातील अत्यंत महत्त्वाच्या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर आज रविवारी पवित्र शाही स्नान या सर्व पत्रकार सदस्यांनी आज येथे केले. यावेळी येथील रहिवासी आणि अध्यात्मक क्षेत्रातील बांधवांकडून या भूमीचे महत्त्व माहीत करून घेतले.अध्यात्मक क्षेत्रामध्ये समता बंधुत्व ऐक्य सर्वोच्च धर्मसमूह आणि शांतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.या अनुषंगाने प्रयागराज चा पत्रकारांचा दौरा अत्यंत फलदायी असल्याचे सांगून ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्लभाऊ सहस्त्रबुद्धे म्हणाले की,तिर्थराज प्रयाग राज हा प्रत्येकाने जाणून घेण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय असून मानवी जीवनासाठी तो एक अमूल्य ठेवा आहे.दरम्यान,आज या पवित्र शाही स्नानानंतर हे पत्रकार बांधव उज्जैन,जय महाकाल येथे रवाना होत आहेत.या ऐतिहासिक आणि धार्मिक सहल प्रवासामध्ये ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, उत्तम बोडखे,दत्ताभाऊ काकडे,प्रवीण पोकळे, प्रा. डॉ.विनोद ढोबळे, भीमराव गुरव,शरद तळेकर, शरद रेडेकर,रघुनाथ कर्डिले,गणेश दळवी,संतोष सानप,सचिन रानडे,मनोज पोकळे आदीसह पदाधिकारी आणि सदस्य पत्रकार बांधव तिर्थक्षेत्र यात्रेत सहभागी आहेत.
stay connected