दुष्काळी आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी खुंटेफळ साठवण तलाव योजना कार्यान्वित होणार
आष्टी प्रतिनिधी
वर्षानुवर्ष दुष्काळाच्या छायाच असलेल्या आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणकारी असलेल्या खुंटेफळ साठवण तलाव ही योजना आष्टी विधानसभा मतदारसंघाचे फायर ब्रँड नेते सुरेश धस यांच्या संकल्पनेला आणि त्यांच्या स्वप्नातला प्रकल्प असून उद्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते प्रकल्पातील बोगद्याचे भूमिपूजन आणि देशभरातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड येथील मंदिराच्या बांधकामाची भूमिपूजन होणार आहे कोणताही समारंभ यशस्वी करण्याची हातोटी आणि खर्च करण्याची दानत असलेले नेते म्हणून सुरेश धस यांची ख्याती आहे त्यांनी या कार्यक्रमाचे भव्य दिव्य नियोजन केले असून आमदार सुरेश धस आणि त्यांचे शिलेदार या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र झटत आहेत सुमारे एक लाख जनसमुदाय उपस्थित ठेवण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत खुंटेफळ साठवण तलाव खुंटेफळ येथे हा कार्यक्रम होणार असून 65000 खुर्च्या आणि छत्रपती संभाजी नगर येथील भव्य दिव्य असा शामियाना उभारण्याचे काम सुरू आहे मराठवाड्याच्या हक्काचे 5.68 टीएमसी पाणी मंजूर असून त्यापैकी एक पॉईंट 68 पाणी खंडवा साठवण तलावामध्ये येणार आहे परंतु आणखी चार टीएमसी पाणी या ठिकाणी साठवण क्षमता असल्यामुळे त्या दृष्टीने या तलावाचे काम सुरू आहे आमदार सुरेश धस यांनी राजकारणाची सुरुवातच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीच आपण राजकारणाच्या आखाड्यात उतरलो आहोत याचे वेळोवेळी अत्यंत दाखवून दिले आहे
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी 80 हजार मतांच्या प्रचंड मताधिक्याने विजय प्राप्त केल्यामुळे या नवीन इनिंग मध्ये ते धडाडीने काम करत आहेत देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री मराठवाड्याच्या हक्काचे उरलेले आणखी चार टीएमसी पाणीदेखील मंजूर करतील या आशेने आष्टी आणि परिसरातील शेतकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी देखील या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहेत आमदार सुरेश धस यांच्या राजकीय कारकीर्दीतील अत्यंत महत्त्वाचा असा हा कार्यक्रम असल्यामुळे त्यांना मानणारा मोठा जनसमुदाय या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांचे सह खासदार बजरंग सोनवणे आमदार प्रकाश सोळंके आमदार संदीप क्षीरसागर आमदार नमिता मुंदडा आमदार विजयसिंह पंडित आणि इतर मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड येथील कार्यक्रमासाठी नारायण गडाचे महंत हरिभक्त परायण शिवाजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाचा विकास झपाट्याने सुरू असून या ठिकाणी देशभरातून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी आणखी सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार सुरेश धस हे प्रयत्नशील असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गहिनीनाथ गडासाठी 25 कोटी रुपये विकास निधी जाहीर केला होता त्याप्रमाणे आष्टी तालुक्यातील या मच्छिंद्रनाथ गडाच्या विकासासाठी प्रथमच श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड येथे येत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून मोठ्या योजनेची अपेक्षा व्यक्त होत आहे
stay connected