पत्रकार पिसाळ यांच्यावर प्राणघातक हल्ला - हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा

 वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पोलिस स्टेशनला निवेदन 



- पत्रकार पिसाळ यांच्यावर प्राणघातक हल्ला 


- हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा




वडवणी / प्रतिनिधी 

पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर खुनी हल्ला करणा-या आरोपीवर गंभीर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने वडवणी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यातील विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला आहे. पत्रकार पिसाळ यांच्या वर हल्ला करणा-या आरोपीवर गंभीर कारवाई व्हावी. या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम.देशमुख सर यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात पोलिस स्टेशन मध्ये निवेदने दिली जात आहेत. त्याअनुषंगाने डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने वडवणी पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रारी निवेदन दाखल करण्यात आले आहे. या निवेदनात असे ही म्हटले आहे की,आपल्या पोलिस स्टेशनच्या माध्यमातून सदर प्रकरणी वरिष्ठांना याबाबत तातडीने कळवुन योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे,वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेचे जेष्ठ मार्गदर्शक सुधाकर पोटभरे,तालुकाध्यक्ष सतिश सोनवणे सचिव महेश सदरे, डिजिटल मिडिया परिषदेचे तालुका अध्यक्ष ओमप्रकाश साबळे, उपाध्यक्ष धम्मपाल डावरे, कोषाध्यक्ष वाजेद पठाण, पत्रकार गितांजली लव्हाळे,

पत्रकार विजय राऊत, पत्रकार अतुल जाधव, पत्रकार संभाजी लांडे, पत्रकार हरी पवार सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.