टाकळसिंग येथे शिक्षण महोत्सवात आरोग्य शिबिर संपन्न

टाकळसिंग येथे शिक्षण महोत्सवात आरोग्य शिबिर संपन्न



 दि.  1 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम श्री  जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, टाकळसिंग, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथे चालू असलेल्या शिक्षण महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर विलास सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर महेश कुमार शिंदे (मुख्याध्यापक) होते.

कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.  महेश नाथ (दंत चिकित्सक, कडा) आणि डॉ.  किरण कवडे (नेत्ररोग तज्ञ, आनंद ऋषी हॉस्पिटल, अहमदनगर) यांनी सहभाग घेतला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बेग (प्राथमिक आरोग्य केंद्र, टाकळसिंग), डॉ  चंद्रकांत चौधरी, आणि डॉ सुनील पठाडे यांची उपस्थिती होती.







कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम जगताप सर आणि प्रवीण कुमार सिद्धेश्वर सर यांनी केले. उद्घाटक डॉ विलास सोनवणे यांनी त्यांच्या शालेय जीवनातील अनुभव कथन करताना प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व आणि त्याची भविष्यातील करिअरवर होणारी सकारात्मक प्रभाव पटवून सांगितली. त्यांनी जिल्हा परिषद शाळा, टाकळसिंगच्या गुणवत्तेबद्दलही गौरवोद्गार काढले.

*प्रमुख मार्गदर्शक डॉ महेश नाथ यांनी लहान वयातच मौखिक आरोग्य कसे राखावे यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी 500 हून अधिक विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी आणि उपचार केले, तसेच आवश्यक असलेल्या मोठ्या उपचारांसाठी त्यांच्या क्लिनिकमध्ये सवलतीत उपचार उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले.*

डॉक्टर महेश कुमार शिंदे यांनी शाळेच्या गुणवत्तावाढीबाबत केलेले प्रयत्न आणि यशस्वी उपक्रमांविषयी माहिती दिली. त्यांनी पीएम श्री जिल्ह्यातील 22 उत्तम शाळांमध्ये शाळेचा समावेश झाल्याचे सांगितले.

नगरवरून आलेल्या आदर्श टीमने सर्व विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी केली आणि त्यासंबंधी सल्ला दिला.

कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक जागरूकतेसाठी मोलाचे योगदान दिले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.