*शालेय साहित्य वाटपातून विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद फुलविले*
सुनील शिरपुरे/यवतमाळ
चंद्रपूर: दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त जि.प.उ.प्राथमिक शाळा जांब (बुज) येथील विद्यार्थ्यांना साहित्यरंग साहित्य मंच नाशिक तर्फे पेन, पेन्सिल आणि समाजसेवक, लेखक तथा कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे यांच्याकडून बुक वाटप करण्यात आले. साहित्याचे वाटप करत असताना शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद फुललेला दिसला. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक मा.देवेंद्र रायपुरे सर, मा.कोहळे सर, मा.पुण्यप्रेडीवार मॅडम, मा.पिपरे सर उपस्थित होते. शालेय साहित्य वाटपानंतर मा.रायपुरे सर, मा.कोहळे सर यांनी अंगुलिमाल मायाबाई उराडे यांना धन्यवाद म्हणत त्यांचे आभार मानले. समाजसेवेचा खरा अर्थ गरजूंच्या शिक्षणासाठी मदत करणे. समाजसेवा हिच खरी सेवा. अंगुलिमाल मायाबाई उराडे यांनी हाती घेतलेला उपक्रम प्रेरणादायी आहे. असे मा.कोहळे सरांनी शब्दातून व्यक्त केले. गोर गरीबांना मोफत रक्त मिळवून देणे, गरिब मुलांना बुक, पेन भेट देणे, साप, पक्षी, विंचू यांना जीवदान देणे, झाडे लावा झाडे जगवा अभियान राबविणे, उन्हाळ्यामध्ये झाडा झाडावरती जलपात्र लटकवून पक्षी वाचवा अभियान राबविणे हे समाजसेवक अंगुलिमाल मायाबाई उराडे यांचे प्रेरणादायी उपक्रम आहेत. त्यांच्या ह्या उपक्रमाचे अनेकांकडून वेळोवेळी कौतुकही केले जाते. नुकताच साहित्य रंग साहित्य मंच नाशिक तर्फे अंगुलिमाल मायाबाई उराडे यांना समाजसेवा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त साहित्यरंग साहित्य मंच नाशिक आणि समाजसेवक अंगुलिमाल मायाबाई उराडे बेंबाळकर यांच्या संयुक्त विद्यमाने बुक, पेन, पेन्सिल या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलले आणि शिक्षकवृंदाकडून अंगुलिमाल मायाबाई उराडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
stay connected