मोरेवाडी साठवण तलावाच्या भूमिपूजन झाल्याशिवाय मोरेवाडीत येणार नाही हा शब्द मी पूर्ण केला.. - आ.सुरेश धस

 मोरेवाडी साठवण तलावाच्या भूमिपूजन झाल्याशिवाय मोरेवाडीत येणार नाही हा शब्द मी पूर्ण केला..
 - आ.सुरेश धस

***********************************






**********************************

आष्टी (प्रतिनिधी)

मोरेवाडी साठवण तलावासाठी मी गेल्या दहा वर्षापासून प्रयत्न करत असून पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मी एकट्याने प्रयत्न केला आणि प्रमाणपत्र मिळवल्यानंतर गेल्या दहा वर्षातील दोन लोकप्रतिनिधींनी याविषयी एक कागद हलवलेला नाही. त्यामुळे मी साठवण तलावाचे भूमिपूजन करण्यासाठीच गावात येईल असा मोरेवाडीकरांना दिलेला शब्द आज पूर्ण करत आहे.या साठवण तलावाच्या भूमिपूजनासाठी मोरेवाडी येथे आलो आहे.या तलावामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले.ते मृद व जलसंधारण विभाग बीड यांच्या अंतर्गत आष्टी तालुक्यातील मोरेवाडी साठवण तलाव भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. लोकनेते आमदार सुरेश धस यांच्या शुभहस्ते साठवण तलाव कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

        आ.धस बोलताना पुढे म्हणाले की,2014 पासून या तलावाच्या कामासाठी आपण होतो.त्याच काळात पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र  मिळाले.मात्र हे काम गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित होते. या दहा वर्षाच्या कालावधी नंतर आज प्रत्यक्षात या तलावाचे काम सुरू होत आहे.याचा मनस्वी आनंद होत आहे. या तलावामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.मोरेवाडी ग्रामस्थांची अनेक दिवसापासूनची ही मागणी होती मागील दहा वर्षांमध्ये या कामात कोणतीही प्रगती झालेली नाही.मोरेवाडीला या तलावाच्या भूमिपूजनाच्या अगोदर येणार नाही असे आपण ठरवले होते. अखेर मोरेवाडी साठवण तलावाचे आज भूमिपूजन करण्यात आले आहे.साठवण तलावाने मोरेवाडी ग्रामस्थांच्या अनेक दिवसांचा प्रश्न मार्गी लागणार असून यातून शेतकऱ्यांच्या जीवनात या प्रकल्पामुळे संजीवनी ठरणार हा प्रकल्पातून शेतकऱ्यांचे जीवमान उंचावण्याचे काम या प्रकल्पामुळे होणार आहे.या साठवण तलाव 7 कोटी 69.67 लक्ष रुपये खर्च करून या साठवण तलाव तयार होणार होणार आहे.शेतकऱ्यांचा भुसंपादनाचा देखील प्रश्न मार्गी लागणार आहे.



यावेळी मोरेवाडी, शेलारवाडी,केरुळ किनी या गावात या गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ह.भ.प. संतोष महाराज मोरे,ह.भ.प.लाड महाराज,ज्येष्ठ पत्रकार प्रफुलभाऊ सहस्रबुद्धे,

रामहरी महारनोर,अशोक ढवण,सुनील सूर्यवंशी, सरपंच संजय थोरवे, सरपंच अंकुश गीते, शिवाजी अनारसे, कल्याण काकडे, सुंदरलाल गर्जे, भाऊसाहेब गोंदकर, संजय पवार,नामदेव काकडे, महादेव मोरे, जाकीर शेख, झाकीर शेख,संजय निंबाळकर,पप्पू बांदल,उपसरपंच सय्यद,माऊली फंड, ज्युनिअर इंजि.मुंडे साहेब आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.