सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत मृण्मयी म्हस्के या विद्यार्थिनीचे घवघवीत यश
===================
===================
विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे येथील श्री. रामराव भगत. (अक्षरमित्र) हे दरवर्षी स्वखर्चाने जागतिक सुंदर हस्ताक्षर दिनाचे औचित्य साधून सर्वांना लिहिते करण्यासाठी विनाशुल्क ऑनलाइन सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्यांनी व शशिकला फाउंडेशन (अमेरिका) यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या ऑनलाइन सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे पाच वयोगटात आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये वयोगट-2 मधून कुमारी मृण्मयी विकास म्हस्के हिचा द्वितीय क्रमांक आला असून ती फिनिक्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल आष्टी येथील इयत्ता नववीच्या वर्गात शिकत आहे. स्पर्धेत बक्षीस स्वरुपात ट्रॉफी, प्रशस्तीपत्र व कॅलिग्राफी पेन सेट पोस्टाने प्राप्त झाले या बक्षिसाचे वितरण फिनिक्स स्कूलच्या प्राचार्या आदरणीय सीमा कांबळे व संस्थापक श्री. नागसेन कांबळे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विकास म्हस्के मेजर उपस्थित होते.
stay connected