मराठी आपली मायबोली तर हिंदी ही राष्ट्रीय भाषा : शायर डॉ.कमर सरूर
अहिल्यानगर - *मराठी आपली मायबोली असली तरी हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे, या संमेलनाच्या निमित्ताने मराठी, हिंदी आणि उर्दू गझल संमेलनाचे आयोजन करून शब्दगंधने तिन्ही भाषांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे, अहिल्यानगर जिल्ह्यात शब्दगंध ची वाटचाल अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.* असे प्रतिपादन प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय उर्दू शायर डॉ. कमर सरूर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनातील मराठी, हिंदी उर्दू गझल संमेलनाच्या आठव्या सत्रात त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या.
यावेळी हुमायून आतार,पाथर्डी,जयश्री सोनार,संदीप राठोड, पारनेर, रतन पिंगट,येवला,बिलाल अहमदनगरी, हनुमंत येवले, कर्जत, श्याम खामकर, पारनेर,संगीता भालसिंग, नेवासा,राम गायकवाड, कोपरगाव, माधव सावंत, चिचोंडी, असिफ अहमद, नगर,प्रशांत वाघ, येवला, बबन धुमाळ, दौड,संदीप ढाकणे, पाथर्डी, विक्रम कांबळे, कर्जत, इत्यादी मराठी हिंदी उर्दू गझलकार सहभागी झाले होते.या गझल सत्राचे सूत्रसंचालन कवयित्री शर्मिला गोसावी व रज्जाक शेख, श्रीरामपूर यांनी केले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, लिहिणाऱ्यांना वाचण्याची आणि समूहासमोर सादर करण्याची कला,हातोटी असली पाहिजे, तरच ती गझल प्रेक्षकांच्या थेट काळजापर्यंत भिडते. आनंद आणि दुःखदप्रसंगीही शायर आपल्या भावना तितक्याच ताकतीने व्यक्त करू शकतो.
यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ.संजीवनी तडेगावकर, स्वागताध्यक्ष संपतदादा बारस्कर, मा.नगरसेवक डॉ. सागर बोरुडे,शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, सचिव सुनील गोसावी, डॉ. अशोक कानडे, प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे, शाहीर भारत गाडेकर, डॉ. तुकाराम गोंदकर, डॉ.अनिल गर्जे ,स्वाती ठूबे, बबनराव गिरी,सुभाष सोनवणे,शिरीष जाधव, राजेंद्र पवार, प्रशांत सूर्यवंशी, राजेंद्र चोभे,मारुती सावंत, पत्रकार आबिद खान,माजी नगरसेवक श्रीनिवास बोज्जा, सिताराम काकडे, प्राचार्य डॉ. जवाहरलाल भंडारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
stay connected