मराठवाड्यातला सततचा दुष्काळ हा भूतकाळ ठरावा यासाठी येत्या दोन वर्षात नदी जोड प्रकल्प मार्गी लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाखोंच्या समुदायासमोर आश्वासन
आष्टी (प्रतिनिधी) मराठवाड्यातल्या अनेक पिढ्यांनी दुष्काळ अनुभवला आहे परंतु पुढच्या पिढीला दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागण्याची वेळ येणार नाही कारण पश्चिम महिन्यांची वाया जाणारे पाणी मराठवाड्याच्या हक्काचे पाणी आपण मिळवणार असून नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्यात साठी 53 टीएमसी पाणी आपण मिळवणार असून त्याद्वारे मराठवाड्यातील शेतकरी शेतमजुरांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणणार आहोत आपलं सरकार हे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार सरकार आहे त्यामुळे या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाच्या जलवाहिनी बोगद्या च्या कामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते सन 2019 मध्येच याचा शासन निर्णय झाला होता परंतु दुर्दैवाने सरकार गेले आणि दोन वर्ष वाया गेली मात्र एकनाथजी शिंदे साहेबांचे नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन झाल्यानंतर दोन वर्ष सतत प्रयत्न करून या कालावधीमध्ये चार नदी जोड प्रकल्प राबवून मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी योजनांवर विचार करण्यात आला आणि मराठवाड्यातला सततचा दुष्काळ हा भूतकाळ ठरावा असे काम सुरू झाले सन 22 मध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन झाल्यानंतर या कामाची सुधारित प्रशासकीय मान्यता पहिल्याच बैठकीत देण्यात आली होती आमदार सुरेश धस यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे न होणारे काम झाले असून यापुढे देखील आणखी चार टीएमसी पाणी देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून पश्चिम वाहिनीचे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणायचे आहे त्या पाण्यातून मराठवाड्यातल्या कानाकोपऱ्यात पाणी उपलब्ध करून देण्यात येईल मराठवाड्याच्या मागच्या पिढीने दुष्काळ पाहिला परंतु या पुढच्या पिढीला दुष्काळाला तोंड देण्याची वेळ येणार नाही असे सरकार काम करत असून पश्चिम महाराष्ट्रातील माणदेश हा एकेकाळी दुष्काळी म्हणून त्यावर कथा कादंबऱ्या लिहिल्या गेल्या परंतु आज संपूर्ण माणदेश हा पाणीदार झालेला आहे त्याचप्रमाणे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी ज्याप्रमाणे प्रयत्न केले हे न होणारे काम त्यांच्या प्रयत्नातून झाले असून पुढचं काम म्हणजे आणखी चार टीएमसी पाणी आणि गोदावरी खोऱ्यातील तुटीचे पाणी आपण मराठवाड्यासाठी आणू आणि पाणी मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू अनेक प्रकल्प उपसा सिंचन योजना या विजयच्या बिला अभावी बंद झालेल्या आहेत हा खर्चात बचत व्हावी यासाठी आपण या उपसा सिंचन योजना यापुढे सोलरवर करणार असून खुंटेफळ साठवण तलावा ही योजना देखील सोलरवर घेण्यात आली आहे
त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज पुरवठा व्हावा यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असून सोळा हजार मेगा वॅट वीज निर्मिती करून मार्च 27 पर्यंत प्रकल्प पूर्ण होऊन बाराही महिने दिवसा वीर तेही मोफत देण्याचा निर्णय झाला असून सौर ऊर्जा निर्मितीमुळे घरगुती ग्राहकांना देखील यापुढे कमी दरामध्ये वीज उपलब्ध करून देऊन ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहोत याचा विश्वास मी तुम्हाला आज या प्रसंगी देतो असे सांगत सध्याच्या बीड जिल्ह्यातील परिस्थितीबाबत भाष्य करताना ते म्हणाले की आपण सर्व शिवछत्रपतींचे मावळे आहोत सर्व जाती धर्मांना घेऊनच एकत्रित नांदावे लागणार आहे त्यामुळे आपण जातीपातीचा विचार न करता अठरा पगड जातींना एकत्र करून चांगले वातावरण निर्मिती करू बीड जिल्ह्याची थोर परंपरा स्वर्गीय प्रमोद महाजन गोपीनाथरावजी मुंडे यांच्या सारख्या महान व्यक्तींचा हा बीड जिल्हा असून सध्याचा जो बीडचा इतिहास आहे तो आपण पुसून टाकावयाचा असून पूर्वीचा बीडचा गौरवशाली इतिहास पुढे सुरू ठेवावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत स्वर्गीय संतोष देशमुख निर्घृणपणे खून करण्यात आला अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत यामध्ये कोणालाही सोडणार नाही असा इशारा दिला
stay connected