लोणी सय्यदमिर येथील शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमाची काल्याच्या कीर्तनाने सांगता

 *शिवजन्म सोहळा सांगता*.

लोणी सय्यदमिर येथील शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमाची काल्याच्या कीर्तनाने सांगता.



*सय्यदमिर बाबा व मंनगिर* *महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या लोणी येथील शिवजन्मोत्सव सोहळा गेली* *अकरा वर्षांपासून गावातील *तरुणांच्या पुढाकारातून जोशपूर्ण वातावरणामध्ये साजरा केला जात आहे*. 

*सलग सात दिवस चालणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे* *ग्रामस्थांना एक मोठी पुण्य पर्वणीची संधी गावातील शिवभक्त तरुणांनी उपलब्ध *करून दिली आहे*.

*दरवर्षी शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या प्रथमदिनी शिवनेरी किल्ल्यावर शेकडो तरुण ज्योत आणण्यासाठी* *जात असतात. दुसऱ्या दिवशी गावांमध्ये ज्योत मिरवणूक होऊन शालेय विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे छत्रपती शिवरायांची आरती घेऊन या सात दिवसीय* *महोत्सवाला सुरुवात होते*.



*महाराष्ट्रातील नामवंत* *विख्यात* *असणाऱ्या कीर्तनकारांची कीर्तन सेवा आयोजित केली जाते. या अकराव्या वर्षीच्या प्रथम कीर्तन सेवेसाठी ह भ प* *अक्रूर महाराज साखरे गेवराई , ह भ प अक्षय महाराज उगले पारनेर, ह भ प अनिल महाराज देवळे सातारा, संतोष महाराज पुजारी कडवेकर, सातारा यांचा भारुडाचा कार्यक्रम झाला. त्याचप्रमाणे भव्य दिव्य स्क्रीनवर* *ऐतिहासिक चित्रपट दाखवला गेला आणि जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय लोणीच्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन हा कार्यक्रम आयोजित *करण्यात आला होता*. 



*आज दिनांक 25. 2. 2025 *रोजी कार्यक्रमाच्या सांगते प्रसंगी ह. भ. प. सोपान *महाराज  सानप ( शास्त्री )* *यांची काल्याची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती*.

*याप्रसंगी महाराजांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर* *आधारित त्यांच्या आयुष्यातील विविध पैलूवर प्रकाश टाकला. याप्रसंगी महाराजांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास वर्णन करताना सांगितले की* *शिवरायांनी एकात्मतेचा संदेश भारत भूमीमध्ये सोळाव्या शतकामध्ये सर्वांसाठी घालून दिलेला आहे. छत्रपती शिवरायांनी सर्व धर्मीय* *मावळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्मितीसाठी संपूर्ण आयुष्य वेचले. स्वराज्य निर्मितीचे जिजामातेचे स्वप्न पूर्ण करताना माता पित्याची सेवा आणि त्यांचे उपकार यांचे मनुष्य जन्मामध्ये विस्मरण* *होऊ नये , देश आणि धर्मासाठी बलिदान देण्याची वेळ आली तरी मागे हटू नये अशा प्रकारचे संस्कार आई-वडिलांनी मुलावर* *घडवावेत, तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता छत्रपती शिवरायांच्या विचारांचे अनुकरण केले पाहिजे अशा प्रकारचा उपदेश आपल्या कीर्तन सेवेतून  केला*.



 *प्रत्येक कुटुंबामध्ये शिवचरित्राचे वाचन असणे अत्यंत गरजेचे आहे असेही महाराजांनी याप्रसंगी सांगितले*.

*याप्रसंगी महाराजांच्या हस्ते दहीहंडी फोडून ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद पंगत आयोजित करण्यात आली होती त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली*.

*याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने महाराजांचा यथोचित सन्मान करण्यात आला*.

*याप्रसंगी गावातील शैक्षणिक ,सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातील सर्वच मान्यवर उपस्थित होते.*



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.