*अंबिकानगर येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी*
*माता रमाई आंबेडकर ह्याच खऱ्या त्यागमूर्ती- डॉ. जितीन वंजारे*
अंबिकानगर येथे दिनांक 7 फेब्रुवारी 2025रोजी माता रमाई जयंती साजरी करण्यात आली.गावातील सर्व भीमसैनिक, माता, बंधू-भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या कार्यक्रमासाठी नागपूर वरून गायन पार्टी अनन्यात आली होती,त्यांचा सुरेल असा भीम गीतांचा कार्यक्रम झाला तसेच कार्यक्रम बौद्धाचार्य वसंत बोर्डे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा दलित नेते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर उपस्थित होते. यावेळी ते भाषणात म्हणाले महामानव विश्वरत्न बोधिसत्व घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानरूपी कार्याला बळ देण्यासाठी माता रमाई ने स्वतःच्या जीवाची हौस- मौज एशो आराम न करता गौऱ्या थापून गवत काडी विकून संसार केला, पोटची पोर पै पैसा कमावून जगवली त्यातून पैसा उरवून डॉ बाबासाहेबांच्या शिक्षणाला मदत केली पण कधी कोणत्या गोष्टीचा मोह केला नाही. सोन-नान पै पैका हवा, चांगल जीवन हवं असा अट्टाहास त्यांनी केला नाही.पोटची पोरगी उपचारा वाचून मेली तिला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी पैसे नव्हते तरीही माता रमाईने डॉ बाबासाहेबाना न कळविता एव्हडं मोठं दुःख गिळून घेतलं कश्याचीही मोह माया ठेवली नाही. माता रमाई च ध्येय फक्त बाबासाहेबाना मोठं झालेलं पाहायच होत. त्या आजारी असायच्या डॉ बाबासाहेब कामानिमित्त बाहेर असायचे पण ह्या मातेने स्वतःची स्वतःच्या मुलांची तमा न बाळगता ह्या नऊ कोटी दलित शोषित पीडित वंचित समूहासाठी त्यांच्या हितासाठी लढणाऱ्या डॉ बाबासाहेबाना साथ दिली. लेकरं पाण्यावाचून,कोणी अण्णावाचून तर कोणी उपचारा वाचून मेली पण माता रमाईने स्वतःच्या संसाराच्या गोष्टी बाबासाहेबाना दुःख होईल त्याच अभ्यासातून मन दूर जाईल आणि ते विचलित होतील म्हणून त्यांना कधीच सांगितलं नाही. हा त्याग हे समर्पण आणि नऊ कोटी दलितांचा उद्धार कारण्याचा त्यांचा हेतू लक्षात घेता त्यांना त्यागमूर्ती म्हणावं वाटत. खरोखर त्यांच्या त्यागाला आणि समर्पनाला तोड नाही. जर माता रमाई ने डॉ बाबासाहेबाना साथ दिली नसती तर कदाचित डॉ बाबासाहेबानी राज्यघटना लिहिली नसती,राज्यकघटना नसती तर तुमचं आमचं दुःख चा वाली कोणी नसता, अजूनही गुलामीची साखळदंड आपल्या भोंवती असतें,माणसाला माणसाचं जीवन दिल जातं नव्हतं त्यांना पशुसम गिनल जायचं,अत्याचार अन्याय झाला असता जातीयवाद धर्मवाद आणि पंथवाद वाढून समाजात एकता समानता आली नसती. सगळे एक दुसऱ्यांचे खुनी झाले असते, दलित शोषित पीडिताचा आवाज दाबला असता त्यांना त्रास झाला असता पण डॉ बाबासाहेबांमुळे दलितांमध्ये झालेल्या परिवर्तनात माता रमाई चे मोठे योगदान आहे. कदाचित हे सगळं बाबासाहेब माता रमाई नसत्या तर करुही शकले नसते. आणि म्हणून नऊ कोटीची माता म्हणून माता रमाईला बोललं जातं.आजच्या माता भगिनीने माता रमाईला आदर्श मानून तिचे संस्कार घेतले पाहिजेत शिक्षणान समाज बदलतो त्यामुळे आपल्या पाल्ल्याला शिकवलं पाहिजे त्याला सुसंस्कारीत केल पाहिजे असे उद्गार सामाजिक कार्यकर्ते डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर आणि बौद्धाचार्य वसंत बोर्डे साहेबांनी काढले.कार्यक्रमात अनेक छोट्या मुलांनी भाषण केली वक्तृत्व स्पर्धा ही घेण्यात आली.डीजे मिरवणूक आणि स्नेहभोजन करून कार्यक्रम संपला.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित प्रभुदास देठे, सुनील राजगुरू, रामदास देठे,भगवान डोळसे, बाबासाहेब राजगुरू, राजू सोनवणे, अस्लम सय्यद, संयोजक अनिकेत राजगुरू, नागेश सोनवणे, पिनू डोळसे, हर्षद देठे, महेश देठे, प्रदीप देठे, पेम देठे, भागवत देठे,इत्यादीसह असंख्य लोक उपस्थित होते.
stay connected