लोकनाट्य कला केंद्रासाठी नवी नियमावली - मंत्री ॲड.आशिष शेलार

 लोकनाट्य कला केंद्रासाठी नवी नियमावली - मंत्री ॲड.आशिष शेलार 












मुंबई, दि. 10 : महाराष्ट्रात लोककला जगली पाहिजे. महाराष्ट्रातील लोकनाट्य केंद्रावर पारंपरिक वाद्ये वाजली जावी. यासाठी संस्कृतिक कार्य विभागाकडून नियमावली तयार करण्यात येईल तसेच महसूल आणि पोलिस यंत्रणेने याकामी आवश्यक ती तातडीची पावले उचलावी, यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी आवश्यक कार्यवाही करण्याचे सांगण्यात येणार असल्याचं  सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी  सांगितले.



महाराष्ट्रातील लोक कलावंतांच्या विविध मागण्यासाठी आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

लोकनाट्य केंद्रावर डी .जे. तसेच व साउंड सिस्टीम सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाली आहे.  या कला केंद्राचे काम अती व शर्तीनुसार होत नसेल तर  जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे महाराष्ट्र कला केंद्रांमध्ये लोकनाट्य व पारंपारिक लावणी शो मध्ये कलाकारांची कमतरता आहे. त्यासाठी नवीन कलाकार तयार व्हावेत यासाठी स्व.पद्मश्री श्रीमती यमुनाबाई वाईकर यांच्या नावे प्रशिक्षण सुरु करण्यात येणार आहे. यासह अन्य लोककलांची नावे पुरस्कार योजनाना देण्याबाबत विभागाने समाजातील जाणकारांच्या सूचना  मागवाव्या असे ही मंत्री शेलार यांनी सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.