माजी आ.दरेकर यांना जीवन गौरव तर प्रा.डाॕ.बोडखे शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार प्रदान

 माजी आ.दरेकर यांना जीवन गौरव तर प्रा.डाॕ.बोडखे  शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार प्रदान


-------------------



-------------------

आष्टी (प्रतिनिधी ) 

शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आष्टीचे माजी आमदार,जेष्ठ नेते साहेबराव दरेकरनाना यांना शब्दगंध जीवन गौरव तर कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डाॕ.जी. पी.बोडखे यांना शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये हा मानाचा पुरस्कार पद्मश्री पोपटराव पवार,आ.संग्राम जगताप, शब्दगंध साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा,जेष्ठ साहित्यिका प्रा.डाॕ.श्रीमती संजीवनी तडेगावकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी माजी जि.प.सदस्य देवीदास धस, शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजेंद्र उदागे,कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे,सचिव सुनील गोसावी, अभिषेक कळमकर आदि मान्यवर उपस्थित होते.शब्दगंध साहित्यिक परिषद आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्यावतीने १६ वे. राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन अहिल्यानगर येथे ज्येष्ठ साहित्यिका,संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.श्रीमती संजीवनी तडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली दि.८ व ९ फेब्रुवारी रोजी पार पडले.



शब्दगंधच्यावतीने नवोदित लेखक,कवींना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम राबवण्यात येतात. त्यामध्ये कथाकथन, काव्यवाचन,परिसंवाद, चर्चासत्र,कथा,काव्यलेखन स्पर्धा,विविध पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन, बालसंस्कार शिबिर असे विविध उपक्रम राबवण्यात येतात.दरवर्षी राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते.त्यामध्ये एका ज्येष्ठ साहित्यिक आणि एका सामाजिक कार्यकर्त्याच्या कार्याची दखल घेऊन त्यांना  शब्दगंध जीवन गौरव आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार देण्यात येतो.यावर्षीचा शब्दगंध जीवन गौरव पुरस्कार सन २०२५  या पुरस्कारासाठी आष्टीचे माजी आमदार,ज्येष्ठ नेते साहेबराव दरेकरनाना यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता.रविवार दि.९ फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर येथील कोहिनूर मंगल कार्यालयात हा पुरस्कार वितरण सोहळा झाला.


-----------------


प्रा.डॉ.गोपीनाथ बोडखे शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित..


-------------


     शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.गोपीनाथ बोडखे यांना शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार - २०२५ ने सन्मानित करण्यात आले. प्रत्येक वर्षी राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. त्यामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार देण्यात येतो.या वर्षीच्या पुरस्कारासाठी  कड्याचे प्रा. डॉ.गोपीनाथ बोडखे यांना जाहीर झाला होता.रविवार दि. ९ फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.हरिदास विधाते, सुनिल गोसावी,अध्यक्ष राजेंद्र गोसावी,कार्याध्यक्ष पांडुळे, सहसचिव प्रा.डॉ.अनिल गर्जे, जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, डॉ.राम बोडखे,उपप्राचार्य डॉ.भास्कर चव्हाण,प्रा.डाॕ. बाळासाहेब धोंडे,चव्हाण, उपप्राचार्य डॉ.संभाजी वाघुले, उपप्राचार्य डॉ.बापु खैरे,प्रा. आर.जी.विधाते,प्रा.डाॕ.विनोद ढोबळे,सेवानिवृत पीएसआय शेख अन्सारभाई,चेअरमन बबन नन्नवरे,माऊली बोडखे,

मुख्याध्यापक साईनाथ बोडखे, इजि.पी.बी.बोडखे,डॉ.एम. आर.पटेल,डॉ.शाम सांगळे,प्रा. अविनाश भवर,डॉ.भीमराज गावडे,डॉ.सज्जन गायकवाड आदि मान्यवर उपस्थित केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.