लाईफलाईन अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!
पहिल्याच वर्षी पटकावली चॅम्पियन ट्रॉफी.
अहिल्यानगर येथे नुकत्याच झालेल्या नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेत कडा येथील लाईफलाईन अबॅकस क्लासेसच्या चार पैकी चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
नुकत्याच झालेल्या नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेमध्ये लाईफलाईन अबॅकस क्लासेसच्या चार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये चॅम्पियनची ट्रॉफी पटकावत अनुष्का अरुण ओव्हाळ हिने सर्वांचे लक्ष वेधले. तसेच सिद्धी परसराम हंबर्डे आणि समृद्धी योगेश बोडखे या विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक मिळवला तर सफा मोहसीन पठाण हिने तृतीय क्रमांक मिळविला.
अनुष्का अरुण ओव्हाळ या विद्यार्थिनीचा शंभर टक्के अचूक उत्तरांसाठी विशेष सन्मान करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे लाईफलाईन अबॅकस क्लासेस चे संचालक साजिद पठाण सर यांनी अभिनंदन केले.
stay connected