"अखंड क्रियाशील नेतृत्व आमदार सुरेश धस "
*****************************
खर तर मनुष्याला जन्म एकदाच मिळतो,या पृथ्वीवर जन्माला येणारा प्रत्येक जण स्वतःसोबत त्याची सुख दुःखे आणि संकट घेऊनच जन्माला येत असतो.जन्म कोठे व कोणाच्या पोटी घ्यावा हे आपल्या हाती नसते पण जन्माला येऊन जन्माचं सार्थक करणं आपल्याच हातात असते म्हणूनच असे म्हणतात की हा जन्म होईतो सार्थकी लावावा.
आज 2 फेब्रुवारी आमदार सुरेश आण्णा धस या समाजप्रिय व्यक्तिमत्वाचा जन्मदिवस,'जन्मा येणे देवा हाती,करणी जग हासावी!' बीड जिल्ह्यात जास्तीत जास्त लोकांना माहिती असलेला राजकारणी व्यक्ती कोण? असा प्रश्न जर आज कोणी विचारला तर ज्या हातांच्या बोटावर मोजता येतील अशा व्यक्ती आहेत त्यात आमदार सुरेश धस यांचे नाव अग्रक्रमाने घाव्ये लागेल.आष्टी तालुक्यातील जामगाव या ग्रामीण भागात अण्णांचा जन्म झाला,घरात कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना महाविद्यालयीन जीवनातच स्वकर्तृत्ववार आपले स्वतःचे नेतृत्व विकसित केले,जामगाव या स्वतःच्या गावातील सरपंच पदापासून सुरू झालेली राजकीय कारकीर्द राज्याच्या मंत्री पदापर्यंत जाऊन पोहचवली,कमी वयात आष्टी सारख्या मोठ्या मतदारसंघाचे आमदार होऊन त्या मतदारसंघाचे नेतृत्व दीर्घकाळ केले.आजही बीड जिल्ह्याच्या राजकारणात तीन दशकाहून अधिकच्या काळात सुरेश धस नावाचे हे गारुड राजकारण व समाजकारणात अखंड क्रियाशील आहे,त्यांचे नाव घेतल्याशिवाय जिल्ह्याच्या राजकारणाचे वर्तुळ पुर्ण होऊ शकत नाही कारण त्यांची असलेली राजकीय दुर्दम्य इच्छाशक्ती व राजकारण करताना अंगी असलेला त्यांच्यातील चिवटपणा, राजकारण हे केवळ मनगटाच्या ताकदीवरच नाही तर बुद्धीच्या कसरतीवरही करावे लागते हेच सिद्ध करणारी अण्णांची आजपर्यंतची राजकीय वाटचाल आहे.कुठलाही राजकीय निर्णय घेताना आण्णा त्याच्या परिणामाची चिंता करत नाहीत पण त्यांनी घेतलेला राजकीय निर्णय योग्यच कसा होता हे सिद्ध करणारे अण्णांचे नेतृत्व आहे.स्वकर्तृत्ववार स्वतःचे नेतृत्व घडवताना आजही आण्णा तरुणांना लाजवेल या उत्साहाने दिवसातील अठरा तास सलग काम करतात किंबहुना वर्षातील बारा ही महिने ते जनतेच्या सुख दुःखात सामील असतात.कुठल्याही संकट काळात जनतेच्या मदतीसाठी सगळ्यात अगोदर पोहचलेला सुरेश धस हा एकमेव नेता आहे,त्यांनी जनतेच्या मदतीसाठी जाताना स्वत कधी वेळेकाळेचे बंधन पाळले नाही मध्यंतरी कोरोना संकट काळात दिवस रात्र लोकांना धस साहेब मदत करत होते म्हणूनच समाजातील सगळ्या थरातील लोकांना त्यांचे नेतृत्व भावते,आपले वाटते.आण्णा राज्याच्या राजकारणात सत्येत असताना मागे उत्तराखंड या राज्यात महाप्रलंय आला होता,तेथील लोकांची मदत करण्यासाठी आण्णा थेट उत्तराखंडमध्ये गेले, तळमळीने लोकांची केलेली मदत सगळ्या महाराष्ट्राने पाहीली, त्या कामाची दखल घेऊन स्वतः शरद पवार साहेब व सुप्रियाताई हे अण्णांचे स्वागत करायला व त्यांना रिसीव करायला विमानतळावर गेले होते.
मंत्रालय असो वा कुठल्याही विभागाचे शासकीय कार्यालय तेथील क्लर्क पासून ते अधिकाऱ्यांपर्यंत कोणाचे काय काम असते व कामे त्यांच्याकडून कसे करून घ्यायचे याची संपूर्ण अद्यावत माहिती असलेला हा नेता आहे,कोणतेही काम हाती घेतल्यावर त्याची संपूर्ण इत्यंभूत माहिती घेतल्याशिवाय आण्णा ते काम तडीस नेत नाहीत.मतदारसंघाच्या विकास कामाच्या फायली स्वतः मंत्रालयात घेऊन फिरणारा हा आमदार सर्वांनी पाहिलेला आहे,कुठल्याही कामाचा कंटाळा या लोकनेत्याने कधी केला नाही,असे म्हणतात की उत्तम राजकारणी तो की जो अनेक राजकीय मान अपमान सहन करतो त्यामुळेच कोणाचे कुठेही व काहीही एकूण घेण्याची क्षमता ठेवणारा हा नेता आहे,कायम राजकारण गंभीरपणे घेऊन त्यासाठी कुठलीही जबाबदारी स्वीकारण्याची त्यांची तयारी असते म्हणून विकास कामे करताना अनेक माणस त्यांनी अंगावर घेतली,राजकीय फायदा तोट्याचा विचार त्यांनी कधी केला नाही.आष्टी शहरात अठरा पगड जातीचे लोकं असताना सुरेश धस यांच्या एका शब्दावर रस्ते कामासाठी अडचणीचे ठरणारे अतिक्रमण लोकांनी काढून घेतले व त्यामुळेच शहरात दर्जेदार रस्ते तयार झाले मतदारसंघात जातीय सलोखा कायम ठेवण्याचा त्यांनी नेहमीच यशस्वी प्रयत्न केला.अण्णांनी त्यांच्या राजकीय जीवनात अनेक सर्वसामान्य कार्यकर्ते मोठे केले त्यांच्या सुख दुःखात कायम त्यांना मदत केली त्यामुळेच निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठी फळी आज मतदारसंघात दिसून येते,अण्णांनी उद्या अचानक पक्ष बदल करून एम.आय.एम.किंवा आर.पी.आय.या पक्षामध्ये जायचा निर्णय घेतला तरी त्यांचे कार्यकर्ते डोळे झाकून त्यांच्या बरोबर त्या पक्षात जातील एवढा विश्वास कार्यकर्त्यांचा अण्णांच्या नेतृत्वावर आहे.
सुरेश धस यांना लोक प्रेमाने आण्णा या एकेरी नावाने संबोधतात व अण्णांनीही स्वतःचा कधी धस साहेब किंवा आण्णासाहेब होऊ दिला नाही,अण्णांनी आपले तन,मन, धन,सेवा,वेळ,ह्रदय हे सगळे जनता जनार्धनाला अर्पण केले म्हणूनच जनतेनेही त्यांना कायम मनातून आपले मानले.तळागाळातील कार्यकर्त्यांशी लहान थोरांशी आण्णा आपुलकीने संवाद साधतात,सत्ता येते व जाते पण सोबत राहतात ती जोडलेली माणस हे अण्णांनी त्यांच्या जवळ असलेल्या अफाट लोकसंग्रह व लोकसंपर्काने दाखवून दिले आहे.कला,क्रीडा,साहित्य,शेती,
ऊसतोडणी कामगार या विविध क्षेत्रातील लोकांना त्यांनी कायम प्रोत्साहन दिले व त्यांना कायम मदतही केली.स्वतःचे रांगडे व्यक्तीमत्व व भाषणातील विशिष्ट ग्रामीण बाज असलेले वक्तृत्व यामुळे आण्णा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. अनेक सर्वसामान्य व विविध जातीधर्मातील अनेक जणांचे नेतृत्व अण्णांनी दुसऱ्या फळीत तयार केले व आपल्या राजकीय डावपेचातुन अनेक आपल्या राजकीय विरोधकांना कात्रज चा घाट दाखवून त्यांना कायमच राजकारण सोडून द्यायला लावणारा एक अवलिया राजकारणी म्हणून अण्णांची ओळख कायमच सगळ्यांना झाली आहे.
इतका सर्वसामान्य लोकांशी नाळ जोडली गेलेला दुसरा तरी कोणताही नेता आज दिसून येत नाही.आजही सर्वसामान्यांचे कुठलेही काम असो ते अण्णांकडेच जाते,लहानापासून ते वृद्धांपर्यंत सर्वाना आस्था,प्रेम आपुलकी असलेले अण्णांचे नेतृत्व आहे.गोर गरीब,वंचित,आजारी लोकांना मदत करताना अण्णांनी कधी पैश्याचा विचार केला नाही,कमविलेला पैसा वेळप्रसंगी अडचणीतल्या सर्वसामान्य लोकांसाठी खर्च करणे ही दानत फक्त सुरेश धस यांच्या मधेच आहे,अनेक गोरगरिबांच्या आशीर्वादामुळेच अण्णांचे नेतृत्व कितीही अडचणींचा काळ आला तरी ते टिकून राहते हे मात्र सत्य आहे.गेली तीस वर्षे झाली अण्णांचा दरारा व दबदबा कायम मतदारसंघात टिकून आहे,सर्वसामान्य माणसे जोडणं हेच अण्णांच्या राजकारणाचे महत्वाचे सूत्र आहे,त्यांना मिळालेला जनतेचा आदर व प्रेम अजून तरी कोणत्याही नेत्याच्या वाट्याला आले नाही,अशा राजकारणातील अखंड क्रियाशील नेतृत्व असलेल्या सुरेश आण्णा धस यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
stay connected