कापशी तलावाची उंची वाढवल्याने ऊस तोडणी साठी स्थलांतरीतांचे प्रमाण कमी होईल : 250 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार- Suresh Dhas

 कापशी तलावाची उंची वाढवल्याने ऊस तोडणी साठी स्थलांतरीतांचे प्रमाण कमी होईल..२५० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार- आ.सुरेश धस

********************************




********************************

आष्टी (प्रतिनिधी)

गेल्या दहा वर्षांत दोन आमदार मतदार संघाला मिळाले पण एकाही आमदाराला या कापशी तलावाची उंची वाढवण्याचे काम करू शकले नाहीत.. तलावाचे उंची वाढवण्याचे काम झाले असते तर या गावातील कमीत कमी 50 कोयते ऊस तोडायला गेले नसते..त्यामुळे स्थलांतरणाचे प्रमाण कमी झाले असते.आता या तलावाची उंची वाढवून 250 हेक्टर जमिन ओलीताखाली येणार असल्याने गावक-यांनी या कामांसाठी हेवेदावे बाजूला ठेऊन एकत्र येऊन सहकार्य करावे असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले आहे.

         आष्टी तालुक्यातील कापशी येथे मृद व जलसंधारण विभाग बीड,101 ते 250 हेक्टर सिंचन क्षमतेचा शुक्रवार दि.14 रोजी सकाळी 11 वा. साठवण तलावाचे गणेश गडाचे महंत ह.भ.प.काशीनाथ महाराज व धर्मराज गडाचे महंत ह.भ.प.रोहिदास गर्जे महाराज यांच्याहस्ते भूमीपुजन करण्यात आले.

    यावेळी आमदार सुरेश धस बोलत होते.यावेळी जि.प.सदस्य अमर निंबाळकर आष्टी तालुका दुध संघाचे चेअरमन संजय गाढवे,माजी सभापती छत्रगुण मरकड, एन.टी.गर्जे,नारायण वनवे,बाबु गर्जे,नवनाथ गर्जे,नवनाथ नागरगोजे, लक्ष्मण ननवरे यांच्यासह आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

     पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,मला विकासाच्या कामात टिका टिप्पणी करायची नाही पण दहा वर्षांत मतदार संघाला दोन आमदार झाले.त्यांना हा कापसीचा तलाव का दिसला नाही जर हा तलाव झाला असता तर किमान 50 कोयता तोडणारांची संख्या कमी झाली असती आता शेतक-यांनी या तलावासाठी शेतक-यांनी सहकार्य करून एका वर्षात तलावाचे काम मार्गी लावतो.

हा साठवण तलाव अतिशय नॅचरल साइटवर असून या साठवण तलावामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम होणारा असून कापसी परिसरातील क्षेत्र ओलीताखाली जाणारा असल्याने मला मनस्वी आनंद होत असून अनेक दिवसाचे ही मागणी आज पूर्णत्वाकडे जात असल्याने गाव पुढा-यांनी गावातील तलावाच्या अडचणी सोडवा प्रशासकीय अडचणी मी सोडतो असा शब्दही आ.धस यांनी दिला.



ह.भ.प.काशीनाथ महाराज म्हणाले,आमदार सुरेश धस यांची मतदार संघात नाळ जुळलेली असून,त्यांनी विकासाचे राजकारण केले व करत आहेत. विकासाचं दृष्टिकोन असलेलं हे व्यक्तिमत्व आहे.

     यावेळी व्हाईट चेअरमन अशोक गर्जे,सुंदरलाल गर्जे,सरपंच महाडिक, सरपंच नंदकिशोर करांडे, सरपंच विकास पवार,सरपंच अशोक इथापे, फारुख मामा, बबन तरटे, शेषराव गर्जे फौजी, पोपट गर्जे,रेवननाथ खाडे, मारुती डीसले, नितीन नाकाडे, वैभव गोल्हार, धनंजय तरटे,शिवाजी गर्जे, काकासाहेब गर्जे, आश्रुबा खलाटे, माणिक दहिफळे, अशोक तरटे, श्रीराम केदार आदीसह कापसी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.