*घाटशील पारगाव येथे हायटेक 4242 बाजरी चे विक्रमी उत्पन्न*
*हायटेक 4242 ह्या बाजरीच्या वाणाची शेतकऱ्यांनी लागवड करावी आणि विक्रमी उत्पन्न घ्यावे-डॉ.जितीन वंजारे*
उन्हाळी आणि पावसाळी बाजरी खाण्यासाठी उत्तम चवीला सुंदर उत्पनाला अतिशय जबरदस्त असणाऱ्या हायटेक सिड्स इंडिया प्रा. ली. च्या हायटेक 4242 ह्या बाजरीला पारगाव घाटशिला येथे एक नंबर ची पसंदी दिली जातं आहे. अनेक शेतकऱ्यांनी ह्या वाणाची लागवड केली असून एक एकरी सुमारे 20 कुंटल उतार काढला आहे. भरगोस उत्पन्न देणाऱ्या ह्या वाणाची अनेकांनी लागवड करावी अस आव्हाहन सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरीनेते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले आहे.
अर्जुन खेडकर आणि धर्मराज खेडकर व प्रदीप खेडकर यांनी जोपसलेली ही बाजरी पावसाळ्यातही भरपूर उत्पन्न देऊन गेली आणि म्हणून त्यांनी त्याच वाणाची उन्हाळ्यात लागवड केली आहे. कंपनी मॅनेजर ओम शिल्लरकर यांनी या शेतकऱ्यांचा शेतात येऊन सत्कार केला. यावेळी गावातील माजी सरपंच वैजिनाथ खेडकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर, अर्जुन खेडकर, प्रदीप खेडकर, धर्मराज खेडकर, लक्ष्मन काळे, यांच्यासह अनेक शेतकरी कष्टकरी गावकरी उपस्थित होते. यावेळी उपस्थित लोकांकडून गावकरी आणि सरपंच यांच्याकडून व कंपनी मॅनेजर ओम शिल्लरकर यांच्याकडून शेतकरी अर्जुन खेडकर व इतरांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी नेते डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांचाही सत्कार करण्यात आला. नंतर भाकरीची चव म्हणून बाजरी ची भाकर आणि बेसन याचा बेत ठेवण्यात आला सर्वांनी भाकरी खाऊन अतिशय चविष्ट आणि उत्पन्नाला भारी असणाऱ्या या बाजरीची च लागवड करू अशी ग्वाही दिली. शेतकऱ्यांना अस्मानी सुलतानी संकटाना सामोरे जावे लागते, घाटशील पारगाव हे एक संघण व पाणी सम्रध गाव असून तेथील मध्यम पाणी प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांना पाण्याची सुविधा झाली आहे. आणि म्हणून वर्षाकाठी दोन तीन चार पीक घेणारे हे गाव तालुक्यातील श्रीमंत शेतकरी गाव म्हणून ओळखले जाते. या गावाच्या एका टेकडीवर माता घाटशिळा देवीचं छान मंदिर असून या देवीच्या नावावरून या गावाला घाटशीळा पारगाव म्हणून ओळखले जाते, अगदी छोट पण चाहूबाजूनी पाण्याच्या कुशीतल डोंगराळ गाव पण शेतीच्या उत्पन्नाने ह्या गावाने अनेक अधिकारी, कर्मचारी,प्रगत शेतकरी दिले आहेत. या गावात बारमाही पाणी असणाऱ्या शेतकऱ्यांनी ह्या हायटेक 4242 बाजरी चे भरघोष उत्पन्न घेतले म्हणून तेथील शेकऱ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर उपस्थित होते. यावेळी सर्व शेतकऱ्यांनी ह्याच बाजरीचे पीक घ्यायची सर्वाना विनंती केली.आणि भरघोष उत्पनाचा दावा केला.
stay connected