तहसीलदार वैशालीताई पाटील यांचा बेलगाव येथे जनता दरबार* महसूल विभागाच्या सर्व अडचणी सोडवू गावकऱ्यांना आश्वासन

 *तहसीलदार वैशालीताई पाटील यांचा बेलगाव येथे जनता दरबार* 
महसूल विभागाच्या सर्व अडचणी सोडवू गावकऱ्यांना आश्वासन 




        आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तहसीलच्या कार्यक्षम तहसीलदार श्रीमती वैशालीताई पाटील यांनी बेलगाव येथील गावकऱ्यासमोर त्यांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्याचे  प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आणि एक प्रकारे त्यांनी बेलगाव येथे जनता दरबारच घेतला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावचे सरपंच तात्यासाहेब शिंदे हे होते. 

     यावेळी गावातील कार्यकर्ते सर्वश्री ॲड उद्धव पोकळे, ॲड सीताराम पोकळे पत्रकार, इंजि.प्रवीण वारे, प्रा. अमृत पोकळे, शहाजी पोकळे सर, अमोल देविदास पोकळे, व गावकऱ्यांनी सातबारा वरील नोंदी ,सातबारा नियमित करणे , पानंद रस्ते ,शिव रस्ते, निराधारांच्या अडचणी  व इतरमहसूल विभागाच्या अडचणी यावेळी त्यांचे समोर सांगितल्या. गावकऱ्यांच्या सर्व अडचणी तहसीलदार मॅडम यांनी ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी दिले.



*गाव कामगार तलाठी म्हणून प्रवीण शिंदे यांनी पदभार स्वीकारला*

     बेळगाव सज्जाचे गाव कामगार तलाठी श्री बनगे भाऊसाहेब यांची बदली झाल्यामुळे त्यांचे जागेवर श्री प्रवीण संदिपान शिंदे यांनी या पदाचा पदभार स्वीकारला. बेलगाव सज्जामध्ये बेलगाव, देसूर, चिंचाळा, शेकापूर, इत्यादी गावांचा समावेश आहे. यावेळी बेलगाव येथून तलाठी पदावर रुजू झालेले शिवप्रसाद दत्तात्रेय पोकळे, तसेच बेलगाव चे नवनियुक्त तलाठी प्रवीण शिंदे आणि तहसीलदार वैशालीताई पाटील यांचा गावकऱ्यांतर्फे यथोचित सत्कार करण्यात आला. 

     यावेळी सरपंच तात्यासाहेब शिंदे उपसरपंच सतीश पोकळे, युवा उद्योजक प्रवीण वारे, माजी सरपंच बन्सी भाऊ पोकळे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पोकळे ,दिलीप पोकळे पुढारी, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब लक्ष्मण पोकळे , सेवा सोसायटीचे चेअरमन नारायण पोकळे,गणेश खोटे, पद्माकर पोकळे ,जालिंदर पोकळे यांचेसह गावकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अमृत पोकळे यांनी केले तर आभार प्रदर्शन गावचे सरपंच तात्यासाहेब शिंदे यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.