अखिल भारतीय मागासवर्गीय समाज प्रबोधन संस्थेच्या
मुलींचे सुयश
आदिवासी कातकरी मुला मुलींची अनुदानित आश्रमशाळा बाबरेच्या मुलींचे सुयश
(मुंबई प्रतिनिधी )
अखिल भारतीय मागासवर्गीय समाज प्रबोधन संस्था संचलित आदिवासी कातकरी मुला मुलींची अनुदानित आश्रमशाळा बाबरे, ता. शहापूर या आश्रमशाळेतील विद्यार्थीनी कुमारी रोहिणी जाधव व कुमारी गौरी पारधी या मुलींनी स्नेहश्री फाउंडेशन या संस्थेमार्फत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय संविधान प्रास्ताविका पाठांतर स्पर्धेमध्ये यश मिळविले. प्रित्यर्थ महाराष्ट्र राज्याचे समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे प्रधान सचिव विजय वाघमारे व उपसचिव रविंद्र जाधव यांना आदर्श कृतशिल मुख्याध्यापिका आशा नवनाथ रणखांबे यांनी विद्यार्थिनी समवेत भेटून शाळेची माहिती दिली. विशेष म्हणजे यांच्या पहिल्या पिढीने पुस्तकाला हात लावला आहे. आजही त्यांचे पालक विटभट्टीवर काम करीत आहेत. आम्हाला आय. ए. एस आय. पी. एस व्हायचे आहे अशी महत्वकांक्षाही व्यक्त केली. या दोन्ही विद्यार्थिनींचे सचिवांनी कौतुक केले.
stay connected