मोफत छावा चित्रपट पाहण्यासाठी चिंचाळा फाट्यावर महिलांची गर्दी
आष्टी ( प्रतिनिधी). सध्या संपूर्ण देशभर गाजत असलेला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील छावा चित्रपट पाहण्यासाठी चिंचाळा बेलगाव पंचक्रोशीतील महिलांनी मोठी गर्दी केली होती. जागतिक महिला दिनाचे दिवशी सौ. सविता अशोक (अण्णा) पोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचाळा फाटा येथे सदरचा चित्रपट दाखवण्यात आला.
चिंचाळा बेलगाव पंचक्रोशीतील पिंपरी आष्टी कासारी भोसले वस्ती मांडवा जळगाव शेकापूर देसूर रागापुर सिद्धेवाडी चिंचाळा बेलगाव इत्यादी गावातील महिला हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या.
सुरुवातीस दूध संघाच्या माजी अध्यक्षा सौ संगीताताई पोकळे व सविताताई पोकळे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब ,छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित सर्व महिलांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
कोविड-19 काळात कुटुंबातील सदस्य एकमेकापासून दूर राहत असताना अशोक अण्णा पोकळे यांनी अनेक गोरगरिबांना आर्थिक मदत केली व समक्ष भेटून धीर दिला.
: मराठा सेवा संघाच्या वतीने चिंचाळा गावचे माजी सरपंच मराठा संघर्ष योद्धा आणि कोविड योद्धा, समाजसेवक अशोक (अण्णा) राजेंद्र पोकळे व त्यांच्या पत्नी सौ सविताताई अशोक पोकळे यांचा वाढदिवसानिमित्त जागतिक महिला दिनाचे दिवशी सन्मान करण्यात आला. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजि. तानाजी (बापू )जंजिरे यांच्या सूचनेनुसार मराठा सेवक ॲड. सीताराम पोकळे ,पत्रकार व जिजाऊ ब्रिगेडच्या शिवमती संगीता पोकळे , अविशांत कुमकर, पत्रकार कृष्णा पोकळे यांनी शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व मराठा सेवा संघाची दिनदर्शिका देऊन हा सन्मान केला.
छत्रपती संभाजी महाराजांवरील *छावा* चित्रपट ,चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहण्याची इच्छा सौ सविताताई यांनी आपले पती अशोक (अण्णा) यांचे जवळ व्यक्त केली. त्यावेळी आपण सदर चित्रपट पंचक्रोशीतील आबाल -वृद्ध, महिला व लोकांना दाखवू असे त्यांनी सांगितले. व सविताताई यांचा वाढदिवस आणि महिला दिनाचे निमित्त साधून अशोकअण्णा पोकळे यांनी सदरचा चित्रपट स्वखर्चाने गोरगरिबांना दाखवला.
आदरणीय अशोक अण्णा पोकळे हे आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. मराठा आरक्षणासाठी त्यांनी चार वेळा आमरण उपोषणाचे हत्यार उपसलेले आहे. मनोज दादा यांच्या वेगवेगळ्या सभा, घोंगडी बैठक पिंपळवंडी, नारायण गडावरील सभा यांच्या प्रचार व प्रसारासाठी आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यामध्ये सायकलवर दौरा केलेला आहे. म्हणूनच मराठा सेवा संघाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
stay connected