जागतिक महिला दिनी श्रीसाई प्रकाशन संस्थेच्या प्रकाशिका, सौ. वैशाली मुन (चांदेकर) चंद्रपुर यांना हिरकणी पुरस्कार प्रदान....
नागपूर
जागतिक महिला दिन आणि माऊली सावित्रीबाई फुले स्मृतीदिनानिमित्त जुना सुभेदार ले -आऊट शारदा चौक येथील स्मृती सभागृहात साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रकाशिका, साहित्यिका, लेखिका, समाजसेविका सौ. वैशाली मुन (चांदेकर) चंद्रपुर अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड आणि थिआँसाँफिकल आँडर आँफ सर्व्हिसच्या संयुक्त विद्यमाने हिरकणी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी आपले मनोगत मांडताना प्रकाशिका, सौ. वैशाली मुन यांनी आपल्याला हा पुरस्कार देण्यात आल्यामुळे आयोजकांचे आणि विशेष करून या संस्थेचा अध्यक्षा डॉ. स्मिता मँडम याचे मनस्वी आभार मानले. हिरकणी हा पुरस्कार खूप मोठा असून आपण जे उल्लेखनीय कार्य करतो आणि आपले समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याची जिद्द मिळत असते. आपल्या जीवनाचा प्रवासात काही तरी दुसरासाठी काही करता येत असेल तर आपले जीवनसत्कर्ममी लागले त्यासारखे अहो भाग्य नाही.
असे मत मांडले, या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य अप्रतिम असा स्वागत सत्कार होता तसेच देण्यात आलेले फुलांनी भरलेले रोपटे देवून तुमचे कार्य असेच फुलांप्रमाणे बहरावे हा मोलांचा संदेश या कार्यक्रमात हजर असणार्या १६विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान स्रीयांना हिरकणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल प्रकाशिका सौ. वैशाली मुन(चांदेकर) हिने आयोजक समितीचे आभार मानले.
stay connected